22 February 2025 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणं म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम करणं - जावेद अख्तर

Rahul Gandhi

मुंबई, २५ मे | देशात सध्या कोरोना आपत्तीमुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची ३ प्रमुख राज्यांत बिकट अवस्था झाली आहे. त्यात देशातील संपूर्ण भाजपाला एकट्या ममता बॅनर्जींनी दिलेली मात ही विरोधकांचा आत्मविश्वास वाढविण्यात कारणीभूत ठरली आहे. तसेच उत्तर प्रदेशात देखील पंचायत निवणुकीत भाजपाची चिंता वाढली आहे. मात्र यामध्ये काँग्रेसने कोणतीही विशेष कामगिरी केलेली नाही. मात्र काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींना पुढे करण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी पाहणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून कायम करण्यासारखं आहे, असा टोला प्रसिद्ध गीतकार आणि संवाद लेखक जावेद अख्तर यांनी लगावला आहे. जावेद अख्तर यांनी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांना हा टोला लगावला आहे.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींना भावी पंतप्रधान संबोधणारं ट्विट केलं होतं. या ट्विटला प्रत्युत्तर देताना जावेद अख्तर यांनी हा टोला लगावला आहे. जावेद अख्तर या ट्विटमध्ये म्हणतात, मिस्टर सलमान खुर्शीद, लोकशाहीचा राजा हा तुमचा विरोधाभास अत्यंत निराशजनक आहे. एक श्रेष्ठ विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी स्वीकारण्या योग्य आहेत. परंतु, त्यांना पंतप्रधान बनविण्याचे जे कोणी स्वप्न पाहत आहेत, ते लोक मोदींना पंतप्रधान म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्नच करत आहेत.

21 मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त खुर्शीद यांनी ट्विटरवर राहुल गांधी आणि राजीव गांधी यांचा फोटो शेअर केला होता. ‘एकेकाळचे आणि भविष्यातील लोकशाहीचे राजे’, अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली होती. त्यावर अख्तर यांनी टीका केली आहे.

 

News English Summary: Mr Salman Khurshid , your oxymoron “ king of democracy” is utterly pathetic. Rahul Gandhi can at best be acceptable as one of the Opposition leaders but any one who fantasizes RG as PM is doing his best to keep Mr Modi as prime minister of India forever said Javed Akhtar.

News English Title: Bollywood lyricist Javed Akhtar rejected Rahul Gandhi for prime minister post candidate news updates.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x