15 January 2025 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Bollywood News | स्त्री 2 च्या कोरिओग्राफरला सुनवली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, वाचा कारण - Marathi News

Highlights:

  • Bollywood News
  • कोरिओग्राफरला झाली 14 दिवसांची जेल – Stree 2 Movie
  • कोरिओग्राफरला मिळालेत राष्ट्रीय पुरस्कार :
Bollywood News

Bollywood News | अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा हा थ्रिलर आणि हॉरर कॉमेडी चित्रपट पाहण्यास प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. या गाण्यातील अभिनेत्री तमन्ना भाटिया हीचं ‘आज की रात नशा हुस्न का’ या गाण्याने अनेक तरुणांना भुरळ घातली आहे.

या गाण्यांमधील तिचा मादक अंदाज पाहून प्रेक्षकवर्ग भारावून गेला आहे. परंतु हे गाणं आणि स्त्री 2 हा चित्रपट सध्या वेगळ्याच हवेत असल्याचा पाहायला मिळतोय. चित्रपटातील या गाजलेल्या गाण्याचा कोरिओग्राफर ‘शैक जानी मास्टर’ याला लैंगिक छळाप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. असं माध्यमांकडून समजत आहे. नेमकं काय आहे प्रकरण पाहूया.

कोरिओग्राफरला झाली 14 दिवसांची जेल :

कोरिओग्राफर शैक जानी मास्टर याच्यावर लैंगिक छळाप्रकरणी आरोप केले आहेत. त्याच्या टीममधील 21 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. हे प्रकरण थेट हैदराबाद कोर्टात पोहोचून 20 सप्टेंबरला जानी मास्टर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हणजेच पुढील दोन आठवडे जानी मास्टर हैदराबादमधील चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये राहणार आहे.

हे प्रकरण ऐकताच स्त्री 2 प्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. या केसबद्दल माध्यमांकडून असं समजतंय की, एफआयआर नोंदवल्यानंतर कोरिओग्राफरला गोव्यामधून अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर घडलेल्या सदर घटनेमध्ये 21 वर्षीय पीडित महिला नाबालिक असल्यामुळे पोक्सो ॲक्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

कोरिओग्राफरला मिळालेत राष्ट्रीय पुरस्कार :

डान्स कोरिओग्राफर जानी मास्टर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत फेमस आहे. त्याने तमिळ तेलगूसह अनेक भाषांमध्ये चित्रपटासाठी गाण्यांची कोरिओग्राफी केली असून, त्याला राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Latest Marathi News | Bollywood News Stree 2 Aaj ki Raat choreographer Jani Master arrested in Goa 21 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

bollywood news(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x