2 February 2025 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan EMI Alert | कर्ज घेण्याचा विचार करताय, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे अडचणी वाढणार नाहीत PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती New Income Tax Slab | पगारदारांनो, तुमचं 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री कसं झालं 'या' चार्टमधून जाणून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - BSE: IRB Bonus Share News | जबरदस्त संधी, ही कंपनी 1 शेअरवर 1 फ्री बोनस शेअर देणार, फायदा घ्या - BSE: 512008
x

अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, पण त्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत

Bollywood Superstar Amitabh Bachchan, Nanavati Hospital, Covid Test Positive

मुंबई, १२ जुलै : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. खुद्द अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समजते आहे. दरम्यान, अभिनेत्री जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन हिची रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्या अजून काही चाचण्याही करण्यात येणार आहेत.

काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?

अमिताभ बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. मात्र त्यांना करोनाची लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

News English Summary: Bollywood Superstar Amitabh Bachchan has been admitted to Nanavati Hospital. They are infected with corona. That is why he has been admitted to the hospital. Superhero Amitabh Bachchan himself has given information in this regard by tweeting.

News English Title: Bollywood Superstar Amitabh Bachchan Admitted To Nanavati Hospital His Covid Test Positive News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x