15 January 2025 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

तनुश्री माध्यमांना चुकीची माहिती देत आहे: सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर

मुंबई : तनुश्री दत्ता पूर्णपणे चुकीची माहिती माध्यमांकडे पोहोचवत आहे आणि प्रसार माध्यमांनी सुद्धा तिच्या विधानांना प्रसिद्धी देताना विचार केला पाहिजे, असे ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर यांनी म्हटले आहे. २०० लोक सेटवर असताना “चॉकलेट” चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तनुश्रीला कपडे काढायला लावले असा आरोप करून तनुश्री चुकीची माहिती माध्यमांना देत आहे, असं सेटवर उपस्थित असणारे सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर यांनी स्पष्ट करून तनुश्रीला फटकारलं आहे.

नाना पाटेकरांसोबतच तनुश्रीने चॉकलेट या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावरही गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप केले होते. २००५ साली ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’ या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मला कपडे काढून नृत्य करायला सांगितले होते, असा गंभीर आरोप तिने केला होता. त्यावर या चित्रपटाचे सहायक्क दिग्दर्शक गझमेर यांनी फेसबुकवरील पोस्टद्वारे प्रतिक्रिया देऊन सत्य उघड केलं आहे.

‘चॉकलेट’ या सिनेमाबाबत माहिती देताना त्यांनी म्हटलं की, ‘चॉकलेट’ या चित्रपटात पहिल्यांदा बिपाशा बासूची निवड करण्यात आली होती. परंतु, तारखांच्या अडचणींमुळे बिपाशा ऐवजी तनुश्री दत्ताची या सिनेमासाठी निवड करण्यात आली. तसेच तनुश्रीची शिफारस मीच केली होती. तनुश्री चित्रपट सृष्टीत नवखी होती. पहिल्यांदा तिला सेटवर काहीच कळायचे नाही. अखेर आमच्या सिनेमाच्या टीमने सुरुवातीला तनुश्रीला नकार दिला. परंतु, मी तनुश्रीची निवड योग्य ठरेल, असे सांगितले होते. अखेर माझ्या शब्दाखातर विवेक अग्निहोत्री यांनी तनुश्री दत्ताची ऑडिशन घेतली आणि या सिनेमासाठी तिची निवड झाली. तनुश्रीला अभिनयात मदत मिळावी यासाठी विवेक अग्निहोत्री यांनी त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना सेटवर पाचारण केले होते.

तनुश्रीला तांत्रिक बाबींचे तसेच अभिनयाचे प्रशिक्षण देण्याची जवाबदारी पल्लवी जोशींकडे होती. तनुश्रीचे मूड अनेकवेळा स्विंग होतात, याची मला पूर्ण कल्पना होती. मात्र शूटिंगदरम्यान ती बराचवेळ तिच्या कारमध्येच बसून राहायची, ती कधी कधी असं का वागायची आणि इतका वेळ ती कारमध्ये नक्की काय करायची ते तिलाच माहिती, असे गझमेर यांनी त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x