22 February 2025 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Bramhastra | KGF 2 नंतर ब्रह्मास्त्र ठरला 2 नंबरचा अ‍ॅडव्हान्स बुकिंग चित्रपट, पहिल्या दिवशी 30 ते 50 कोटींचे कलेक्शन अपेक्षित

Brahmastra

Brahmastra |  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही घडत आले जे गेल्या 100 वर्षांमध्ये घडले नाही. मधल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दर आठवड्याला एक चित्रपट बॉयकॉट होत आहे. चित्रपटाबाबत सोशल मीडियावर हॅशटॅग आणि बॉयकॉटचा ट्रेंड सुरु झाला आहे. असे म्हटले जात आहे की, बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कमी झाले आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांचा कल आता साउथ चित्रपटाकडे वळाला आहे.

ब्रह्मास्त्र रिलीजपूर्वीच अनेक रेकॉर्ड तोडणार
तब्बल 400 कोटींचा बनलेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट रिलीज पुर्वीच अनेक रेकॉर्ड तोडणार असे म्हटले जात आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे मात्र 2 दिवस आधीच या चित्रपटाचे बुकींग फुल झाले आहे. दरम्यान, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्षातील सर्वाधिक आगाऊ बुकिंगच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याबाबत ट्रेड विश्लेषकांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा अॅडव्हान्स बुकींग चित्रपट
2022 मधील ब्रह्मास्त्र हा दुसऱ्या क्रमांकाचा अॅडव्हान्स बुकींग चित्रपट ठरला आहे. कोरोनाच्या काळानंतर KGF 2 हा आगाऊ बुकिंगच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, KGF 2 साठी बॉक्स ऑफिसवर 4.11 लाख तिकिटे आगाऊ बुक करण्यात आली होती.

रणबीरची ओपनर फिल्म ठरली संजू
या आधीही रणबीरचा चित्रपट आगाऊ बुकींगसाठी समोर आला होता. संजू चित्रपटासाठी बुधवारपर्यंत 1.08 लाख रुपयांची आगाऊ बुकिंग करण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांनी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाने संजू चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचा आकडा पार केला आहे. रणबीरच्या सर्वाधिक बुकिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत संजू नंतर ब्रह्मास्त्रचे नाव अग्रस्थानी आले आहे.

वीकेंडला 2 लाख तर सुरुवातीच्या दिवशी 1 लाख अॅडव्हान्स बुकिंग
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाची तीन नॅशनल थिएटर चेन्स, पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसमध्ये पहिल्या दिवसासाठी 1 लाख तिकिटे विकली आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार वीकेंडला ब्रह्मास्त्र चित्रपटाची 2 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. आजूनही या चित्रपटाची बुकींग सुरु आहे त्यामुळे आकडा मोठा ही होण्याची शक्यता आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटाचे पहिल्या दिवशी 30 ते 50 कोटींचे कलेक्शन अपेक्षित
ब्रह्मास्त्र चित्रपटाला 400 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, या चित्रपटाने जास्त कमाई करायला हवी. विश्लेशकांच्या मते ब्रह्मास्त्र सहज भूल भुलैया २ चा रेकॉर्ड मोडेल. दरम्यान, पहिल्या दिवशी भूल भुलैया 2 चे कलेक्शन 14 कोटी रुपये होते तर सूर्यवंशीने चित्रपटाने पहिल्या दिवशी 26 कोटी रुपयांची कमाई केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brahmastra became the number 2 advance booking film after KGF 2 Checks details 09 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Brahmastra(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x