18 November 2024 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
x

Brahmastra Movie | 8 हजारांहून अधिक स्क्रीन्सवर ब्रह्मास्त्र झाला रिलीज, पण हिट की फ्लॉप वाचा

Brahmastra

Brahmastra | नुकताच 9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर कपूर-आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाला चाहत्यांकडून उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाचे कलेक्शन 160 कोटींचे झाल्याचे ब्रह्मास्त्र चित्रपटाचे निर्माते करण जोहरने म्हटले आहे.

वीकेंडला किती झाले कलेक्शन
ब्रह्मास्त्र चित्रपट वीकेंडला गल्ल्याच्या बाबतीत बेलगाम झाला होता. मात्र आठवड्याच्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली. मात्र चित्रपटाने वेग कायम ठेवत सोमवारी 15.5 कोटी आणि मंगळवारी 12.75 ते 13.75 कोटींची कमाई केली आहे.

चित्रपट फ्लॉप की हिट?
दरम्यान, चित्रपटाने रिलीज पासून आपले कलेक्शन जोमाचे ठेवले आहे मात्र चित्रपटाचे बजेट खुप जास्त आहे, त्यामानाने चित्रपटाने कमाई केली का ? आणि केली असेल तरच हा चित्रपट ब्लॉकबस्टरच्या श्रेणीत ठेवणे योग्य होईल. दरम्यान, चित्रपटाला ब्लॉकबस्ट ठरण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

8 हजारांहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला :
ब्रह्मास्त्र भाग 1: अयान मुखर्जीच्या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर $ 28.2 दशलक्ष म्हणजेच 224 कोटी रुपयांची कमाई केली आहे. माध्यमांनुसार चित्रपट भारतात 5,019 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि तीन दिवसात 125 कोटी रुपये कमवले, तसेच परदेशात चित्रपटाच्या स्क्रीन्सची संख्या 3,894 होती, या चित्रपटाने उर्वरित रक्कम जमा केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brahmastra Movie updated news Checks details 15 September 2022.

हॅशटॅग्स

Brahmastra(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x