करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ २०१९ मधील | तेव्हा गृहमंत्री फडणवीसांनी चौकशी का केली नाही
मुंबई, १८ डिसेंबर: बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने (NCB) निर्माता करण जोहरला समन्स जारी केलं आहे. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. याआधी देखील एनसीबीने बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स पाठवून चौकशी केलीय. त्यानंतर अनेक कलाकारांच्या अडचणीत वाढही होताना दिसली. त्यामुळे आता यावेळी करण जोहरबाबत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (NCB Summons Bollywood Film Producer Karan Johar in Drugs Case).
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एनसीबीने बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाललाही समन्स बजावलं होतं. मागील काही दिवसांपासून एनसीबी बॉलिवूडशी असलेल्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत आहे. याच प्रकरणात एनसीबीला करण जोहरकडून काही माहिती हवी आहे. ती माहिती मिळवण्यासाठी एनसीबीने करण जोहरला समन्स बजावलं आहे. ही माहिती वकिलामार्फत देणार की स्वतः एनसीबीसमोर उपस्थित राहून देणार हे करण जोहरनेच ठरवायचं आहे
संबंधित व्हिडिओ २०१९ मध्ये व्हायरल झाला, त्यावेळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी, असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटले नाही. पार्टीच्या व्हिडिओवरून करणला चौकशीस बोलवणारी एनसीबी कंगना राणावतला चौकशीसाठी बोलवण्यास का घाबरते? ड्रग संदर्भात तिचाही एक व्हिडिओ वायरल झालेला आहे. तिच्याबद्दल एनसीबीला एवढी आपुलकी का व कशासाठी?, असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारले आहेत.
एका पार्टीच्या व्हिडिओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते तर मग कंगनाच्या चौकशीची हिम्मत एनसीबी का दाखवत नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ असावा. करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ २०१९ चा आहे त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते त्यांनी यावर खुलासा करावा’, अशी मागणीच सचिन सावंत यांनी केली.
News English Summary: NCB has issued summons to producer Karan Johar in the Bollywood drugs case. This has created quite a stir. Earlier, the NCB had issued summons to several big names in Bollywood in drug cases. After that, the difficulty of many artists also increased. So now it will be important to see what happens to Karan Johar
News English Title: Congress Spokesperson Sachin Sawant slams Fadnavis over NCB Summons Bollywood producer Karan Johar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER