21 February 2025 5:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Dharmveer 2 OTT | 'धर्मवीर 2' ओटीटीवर प्रदर्शित, नेमका कुठे दिसेल चित्रपट जाणून घ्या

Dharmveer 2 OTT

Dharmveer 2 OTT | 27 सप्टेंबर रोजी सिनेमागृहांत धुमाकूळ घालणारा सिनेमा ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांना कधी एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल याची उत्सुकता लागली होती. आज-काल बरेच सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरच पाहिले जातात.

2022 रोजी ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत अभिनेता क्षितिज दाते आणि आनंद दिघे यांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता आणि हास्य जत्रा फेम प्रसाद ओक चित्रपटात झळकले होते. दरम्यान त्यांचा हा चित्रपट 2022 सालच्या 13 मे या तारखेला प्रदर्शित झाला होता. समस्त ठाणेकरांसाठी या चित्रपटापेक्षा अभिमानाची गोष्ट कोणतीच नव्हती.

ही गोष्ट ठाऊक आहे का :
दरम्यान ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाने देखील सिनेमागृहांत बाजी मारली. आता तुम्ही हा चित्रपट थेट तुमच्या घरात बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. अशातच तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे का की, धर्मवीर 2 हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजीच प्रदर्शित होणार होता. परंतु पावसाच्या अतिवृष्टीमुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी आनंद दिघे यांचा धर्मवीर 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.

प्रसाद ओक यांची खास पोस्ट :
चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना देखील झाला नाही तरीसुद्धा खास प्रेक्षक मायबापांकरिता धर्मवीर 2 च्या टीमने चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. प्रसाद ओक यांनी चित्रपटाबाबत ओटीटीवर रिलीज होण्याची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडल पेजवर ही माहिती दिली असून कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की,”ज्यांनी कधीच नाही केली तत्वांशी तडजोड, अशा धर्मवीर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची आहे ही गोष्ट.. पहा धर्मवीर 2 फक्त ZEE5 वर”. अशी पोस्ट करत प्रसाद ओक यांनी प्रेक्षकांना खुशखबर कळवली आहे.

चित्रपटाचे कलेक्शन :
‘धर्मवीर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली होती. चित्रपटांनी पहिल्याच दिवशी तब्बल 1.92 कोटी रुपयांची कमाई केली. अशातच निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 वर्षाच्या सर्वाधिक जास्त ओपनिंग कमाई करणार हा पहिला चित्रपट ठरला आहे. दरम्यान माहितीनुसार या चित्रपटाने फार कमी दिवसांत 15.5 कोटी रुपये कमावले आहेत.

Latest Marathi News | Dharmveer 2 OTT 27 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dharmveer 2 OTT(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x