Disha Salian | सीबीआयकडून मोठा खुलासा, दिशा सालियन नशेत असताना अपघाती मृत्यू, खोटारड्या राणे पितापुत्राचं भांड फुटलं

Disha Salian | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला होता. राणेंमुळे आपल्या मुलीची बदनामी होत आहे, त्यांनी तिची बदनामी करणं थांबवावं, असं आवाहन सालियन कुटुंबीयांनी केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसांत राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र आता त्याही पुढे राणे पिता पुत्राचं भांड सीबीआयसंबंधित वृत्तानंतर फुटलं आहे.
सीबीआयने मोठा खुलासा
अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियनचा मृत्यू नशेत असताना 14 व्या मजल्यावरून तोल गेल्याने छतावरून पडून झाल्याचा सीबीआयने निष्कर्ष काढला आहे. याबद्दल अहवाल सादर केला आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असल्याचं स्पष्ट केलं आहे.
साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Disha Salian Death was an accidental says CBI after clarified through investigation check details on 23 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON