22 January 2025 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा

Drashti Dhami

Drashti Dhami | 2012 रोजी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजेच ‘मधुबाला’. कलर्स टीव्हीवरील मधुबाला या मालिकेने फार कमी वेळात लोकप्रसिद्धी मिळवली होती. या मालिकेमधील मुख्य अभिनेत्री मधुबाला म्हणजेच दृष्टी धामी आई झाली आहे. तिने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली असून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिले आहेत.

मधुबाला मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन
छोट्या पडद्यावर काम करून नावारूपास आलेली अभिनेत्री दृष्टी धामी हिने छोट्या रुपेरी पडद्यावर काम करून चाहत्यांचं मनोरंजन केलं. सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या मालिकेनंतर दृष्टीने टीव्ही सिरीयल एकंदरीत रूपेरी पडद्यावरून एक्झिट घेतली होती. परंतु दृष्टी इंस्टाग्रामवर कमालीची सक्रिय असलेली पाहायला मिळते. तिने लेकीची गोड बातमी देखील इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.

चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव :
दृष्टीच्या चाहत्यांनी लेकीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर दृष्टी आणि तिच्या पतीचं देखील अभिनंदन केलं आहे. दृष्टीने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून पती नीरजने पिवळ्या रंगाचा कुरता घातला आहे. त्याचबरोबर दोघांनी बाळाला मांडीवर घेतलं असून बाळाचा चेहरा दिसत नाहीये. लेकीच्या येण्याने दृष्टी अतिशय आनंदात आणि उत्साहात पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Drashti Dhami 💜 (@dhamidrashti)

दरम्यान दृष्टीची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग पाहायला मिळते. तिने रुपेरी पडद्यावरून एक्झिट घेतली असली तरीसुद्धा, सोशल मीडियावरती कमालीची सक्रिय असते. कॉमेडी रील, पार्टी रील अशा पद्धतीच्या व्हिडिओज दृष्टी कायम बनवत असते आणि चाहत्यांचं मनोरंजन करत असते. तिने बाळ जन्माला यायच्या आधी देखील बेबी बंप दाखवतानाच्या बऱ्याच रील आणि गमतीशीर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या तिला आईपण प्राप्त झालं असून, लेकी सोबतच्या कोण कोणत्या व्हिडिओज पाहायला मिळतील याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Latest Marathi News | Drashti Dhami 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Drashti Dhami(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x