17 April 2025 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
x

"चला हवा येउ द्या" मधील एक सदस्य अडकणार लग्नाच्या बेडीत.

औरंगाबाद : ‘चला हवा येउ द्या’ शो मधील थुकरटवाडी आणि त्यातील विनोदाचे सम्राट कुशल बद्रिके,सागर कारंडे,भारत गणेशपुरे, भाऊ कदम, डॉ. निलेश साबळे आणि श्रेया बुगडे हे सगळ्यांनाच परिचित आहेत. यातील सर्वच विनोदी कलाकार हे आज मराठी घराघरात पोहोचले आहेत.

पण त्याच आपल्या थुकरटवाडीतील आणखी एक सदस्य जो नेहमीच रसिकांना खळखळून हसवतो आणि ज्याची मूर्ती लहान पण विनोद करण्याची त्याची कीर्ती महान आहे. रसिकप्रेक्षकांना तो नेहमीच ‘चला हवा येउ द्या’ शोच्या सेट वर छोटा पॅक और बडा धमाका म्हणून परिचित आहे.

त्या विनोदवीराचे नाव आहे विनीत बोंडे. आपण त्याच्या अभिनयाची झलक ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमातून अनुभवली आहे. पण इतर विनोदवीरांप्रमाणेच त्यालाही म्हणजे विनीत बोंडेला खरी ओळख मिळवून दिली ती ‘चला हवा येउ द्या’ या भन्नाट विनोदी शोने.

हाच विनीत बोंडे आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोनम पवार या मुलीशी त्याचा विवाह जमलं आहे. काही दिवसांपूर्वीच विनीत आणि सोनम यांचा साखरपुडा औरंगाबाद येथे पार पडला. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते. त्याचा विवाह सोहळा सुद्धा औरंगाबाद येथेच ४ मार्चला पार पडणार आहे. सोनम पवार ही मूळची सोलापूरची असून ती पुण्यात नर्सिंगचं शिक्षण घेत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chala Hawa Yeu Dya(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या