Neha Kakkar | नेहा कक्कर कडून फाल्गुनी पाठकच्या 'मैने पायल है छनकाई' गाण्याचा रिमेक, फाल्गुनी पाठक प्रचंड संतापली, काय म्हंटले?

Neha Kakkar | बॉलिवूडमधील नेहा कक्कर तर सर्वांना माहिती आहे. इंडियन आयडल या शो मध्ये होस्टींग करताना अनेकदा ती आपल्याला दिसून आली आहे. तसेच तिच्या पर्सनल लाइफ बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम आतूर असतात. नुकतेत नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत यांचे ‘तुमको बारिश पसंद है मुझको बारिश मे तुम’हे गाणे समोर आले आहे ज्याला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. दरम्यान, या गाण्यानंतर नेहाने एका जुन्या गाण्यावर रिमेक बनवला आहे. जो सध्या वादामध्ये असल्याचे दिसून येत आहे.
जुन्या गाण्याचा रिमेक
जुनी गाण्यांमध्ये थोडासा बदल करून रिमेक करण्याचा ट्रेंड कधी कधी गायकांना भारावून टाकतो मात्र या रिमेकसाठी नेहाला सोशल मीडियावर लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले आहे. नेहा कक्करने, फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या प्रसिद्ध गाण्याचे रिमिक्स बनवले आहे तर यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्याचवेळी मूळ गायिका फाल्गुनी पाठकनेही या गाण्याबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
रिमिक्स रिलीज झाले :
दरम्यान, नेहा कक्करने नुकतेच फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याचे रिमिक्स रिलीज केले आहे तर नेहाने या गाण्याला फक्त तिचा आवाज दिला नाही तर ती स्वतःही या गाण्यात दिसून येत आहे. नेहाने हे गाणे रिलीज करताच काही युजर्सला तिचे रिमिक्स आवडले नाही आणि त्यांनी गायिकेला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक युजर्सचे म्हणणे आहे की नेहाने या गाण्याशी छेडछाडच केली नाही तर ती खराब देखील केले आहे.
यावर फाल्गुनी पाठकही संतापली आहे :
‘मैने पायल है छनकाई’ हे गाणे 90 च्या दशकातील फाल्गुनी पाठक यांचे सुपरहिट गाणे आहे. या गाण्याचे रिमिक्स ऐकून युजर्स प्रचंड भडकले आहेत. गाण्याची मूळ गायिका फाल्गुनी पाठकनेही यावर न बोलता आपली नाराजी व्यक्त केली आहे. फाल्गुनी यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर काही युजर्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉट्समध्ये यूजर्स नेहा कक्करला रिमिक्समुळे ट्रोल करताना दिसून येत आहेत. तर एका यूजरने लिहिले की, ‘नेहा कक्करने थोडा मेंदू वापरावा.’ तर आणखी एका युजरने लिहिले की- ‘मला माझ्या बालपणीच्या आठवणींबद्दल खेद वाटतो ज्याची दुरवस्था झाली आहे.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Falguni Pathak Angry on Neha Kakkar song remake checks details 25 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK