23 December 2024 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

महेश मांजरेकर मूत्राशयाच्या कर्करोगाने होते पीडित | यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतले

Mahesh Manjrekar

मुंबई, २३ ऑगस्ट | मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. आता बातमी आहे की, अलीकडेच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. महेश मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महेश आता घरी परतले असून हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

महेश मांजरेकर मूत्राशयाच्या कर्करोगाने होते पीडित, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतले (Film director Mahesh Manjrekar undergoes surgery of urinary bladder cancer) :

रिपोर्ट्सनुसार, महेश मांजरेकरांवर मूत्राशयाच्या कर्करोगावर 10 दिवसांपूर्वी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर ते काही दिवस रुग्णालयात होते. हॉस्पिटलच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, महेश यांच्यावर शस्त्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली आहे. ते आता बरे होत असून रुग्णालयातून घरी परतले आहेत.

मराठी व्यतिरिक्त महेश यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये केले काम:
महेश मांजरेकर यांनी 1992 मध्ये ‘जिवा सखा’ या मराठी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मराठी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘प्लान’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’, कांटे, ‘दस कहानियां’, ‘वॉन्टेड’, ‘रेडी’ आणि ‘दबंग’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत. (Mahesh Manjrekar undergoes surgery of urinary bladder cancer)

महेश मांजरेकर केवळ अभिनेतेच नाही तर दिग्दर्शकही आहेत. त्यांनी ‘आई’, ‘वास्तव’, ‘निदान’ आणि ‘विरुध’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे महेश एक उत्तम डान्सर देखील आहे, 2006 मध्ये ‘झलक दिखला जा’ या शोचे ते सेकंड रनरअप होते. 2018 मध्ये त्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालनदेखील केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Film director Mahesh Manjrekar undergoes surgery of urinary bladder cancer news updates.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x