4 February 2025 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे, सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला, 85 हजारांचा टप्पा ओलांडला, नवे दर तपासून घ्या Adani Power Share Price | तज्ज्ञांकडून अदानी पॉवर शेअरला 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Income Tax Return | स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा कोणाला होतो, जाणून घ्या नव्या आणि जुन्या टॅक्स रिजीममधील मर्यादा किती आहे IPO GMP | स्वस्त आयपीओ आला रे, IPO शेअरचा ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल SBI Home Loan | SBI बँकेकडून 30 लाखांचे गृहकर्ज हवे असेल तर, महिन्याला किती पगार असायला हवा इथे जाणून घ्या Bank Fixed Deposit | संकटकाळी बँकेतील FD मोडण्यापेक्षा 'या' गोष्टी करा, मुद्दलसह व्याज वाचेल, फायदा होईल Mutual Fund SIP | 4 वर्षांच्या आत मिळतील 50 लाख रुपये, कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल, इथे पहा
x

Phullwanti Release | हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापची चित्रपटाबाबत खास पोस्ट, म्हणाला 'फुलवंतीचे म्हणजे प्राजुचे खूप खूप आभार'

Phullwanti Release

Phullwanti Release | हस्तेजत्रा फेम प्राजक्ता माळी हीच्या फुलवंती या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वत्र धुमशा घातला होता. दरम्यान आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपटाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये ‘फुलवंती’ म्हणजेच पेशवाईतील एका मदनमंजिरी कलासक्त नर्तिकेची कथा आहे. चित्रपटाबाबत हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप याने आपली लाडकी मैत्रिणी प्राजु हीच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान या पोस्टला त्याने मैत्रीचा कौतुक करत चित्रपटाबाबत असं लिहिलं आहे. जाणून घेऊ.

पृथ्वीक प्रतापच्या पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष :
कॉमेडी स्टार पृथ्वीक प्रताप याने इंस्टाग्राम अकाउंटवर फुलवंती चित्रपटाबाबत काही खास फोटोज शेअर केले आहेत. फोटोजमध्ये दाखवल्याप्रमाणे हास्य जत्रेतील काही मंडळी चित्रपटात झळकले असल्याची माहिती समोर येत आहे. पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये हास्य जत्रेमधील कॉमेडी किंग समीर चौगुले, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, निरागस विनोद वीर पृथ्वीक प्रताप आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट या चौघांनी पेशव्यांच्या काळातील वस्त्र परिधान केले आहे. फोटोमध्ये मराठमोळे अभिनेते ऋषिकेश जोशी देखील पाहायला मिळत आहेत. हा फोटो फुलवंती सेटवरचा असल्याचा समजतोय. त्यामुळे हास्यजत्रेतील या नावाजलेल्या कलाकारांनी चित्रपटात कोणकोणत्या भूमिका साकारल्या आहेत हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेच ठरलं आहे.

पृथ्वीकने लाडक्या मैत्रिणीसाठी लिहिलं खास कॅप्शन :
फोटोज पोस्ट करत पृथ्वीक लिहितो की,”तुझ्या पहिल्या महिला निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा मैत्रिणी. अतिउत्तम अभिनय, दिग्दर्शन, लेखन, संगीत, छायाचित्रण, वेशभूषा आणि कथा. खूप काळानंतर असा डोळे दीपावून टाकणारा सिनेमा पाहिला. या सिनेमाचा छोटासा भाग करून घेतल्याबद्दल स्नेहल तरडे, प्रवीण तरडे मंगेश पवार आणि आमच्या फुलवंतीचे म्हणजे प्राजुचे खूप खूप आभार”. असं कॅप्शन लिहत पृथ्वीकने ही पोस्ट शेअर केली आहे. पृथ्वीच्या या पोस्टला चाहत्यांनी डोक्यावर धरलं आहे. अनेकांनी प्राजक्ता आणि पृथ्वीची लव्ह स्टोरी सुरू आहे का असे प्रश्न भन्नाट कमेंट्स करत दोघांचंही अभिनंदन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PRITHVIK PRATAP (@prithvikpratap)

जाणून घ्या फुलवंती विषयी :
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट उभारण्यात आला आहे. पेशवे काळातील एका सुंदर नर्तिकेची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. एक साध्या कलाकाराची म्हणजेच त्या नर्तिकेच्या अपमानाची एक धारदार कथा मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपटात केवळ फुलवंतीचा अपमानच नाही तर, तिच्या आयुष्यामधील प्रेम, नृत्य त्याचबरोबर तिचा स्वाभिमान या सर्व गोष्टींतील संघर्ष दाखवणार आहे चित्रपट कथेतून उलगडला गेला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘मदनमंजिरी सुबक ठेंगणी’ या गाण्यातून स्वतःच्या मादक अंदाजाची आणि चित्रपटातील फुलवंती भूमिकेची झलक सर्वांना दाखवली होती. चांगले चित्रपट पाहण्यासाठी बरेचजण प्रचंड उत्सुक होते.

Latest Marathi News | Phullwanti Release 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Fulvanti Release(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x