22 December 2024 9:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

Har Har Mahadev | चित्रपटगृहांमध्ये पुन्हा गरजणार 'शिवगर्जना', 'हर हर महादेव'चा दुसरा ट्रलेर आऊट

Har Har Mahadev

Har Har Mahadev | गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमांनी जबरदस्त चित्रपटांचा तडखा चाहत्यांना चाखला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रत्येक मराठी चित्रपट हा गाजचाल आहे आणि त्या चित्रपटाने आपला इतिहास स्वत: लिहीला आहे. दरम्यान, अभिनेता शरद केळकरच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाला आहे. तर हा चित्रपट मूळचा मराठीमध्ये असणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. तसेच या चित्रपटात शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. त्यांना शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर हा टीझर तुम्हाला गूजबंप देण्यासाठी पुरेसा आहे.

शरद केळकर यांचा दमदार अभिनय आणि आवाज :
‘हर हर महादेव’ या चित्रपटात बाजी प्रभूंच्या नेतृत्वाखालील युद्धाची कथा मांडण्यात आली आहे तर जिथे केवळ 300 सैनिकांनी 12,000 शत्रू सैन्याशी लढा दिला आणि खिंड जिंकली. या विजयासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि बलिदान दिले तर शरद केळकर त्याच्या दमदार आवाजाने संपूर्ण टीझरमध्ये त्याला खिळवून ठेवताना दिसून येत आहेत.

टीझर शेअर करताना झी स्टुडिओने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की :
हर हर महादेवच्या गजराने त्यांनी शत्रूंचे मन हेलावले आहे तर माँ विंझाईचा आशीर्वाद मिळाल्याने त्यांनी रणांगणावर आपल्या रक्ताचा अभिषेक केला आहे. स्वराज्याचा सुवर्ण इतिहास आपल्या पराक्रमाने पावन करणाऱ्या शूर बाजी प्रभू देशपांडे यांना विनम्र अभिवादन. या दिवाळीत 25 ऑक्टोबरपासून हर हर महादेवची शिवगर्जना मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांमध्ये भारतभरातील सिनेमागृहांमध्ये ऐकू येणार आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होईल :
या चित्रपटाचे लेखन अभिजित देशभांडे यांनी केले आहे तर ते या चित्रपटाचे दिग्दर्शकही आहेत. चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. अन्य कलाकारांमध्ये सायली संजीव आणि अमृता खानविलकर यांचाही समावेश आहे. झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Har Har Mahadev Movie checks details 10 October 2022.

हॅशटॅग्स

Har Har Mahadev(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x