17 April 2025 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

खात्री न करता व्हॉइस ओव्हर दिला, नंतर ऐतिहासिक संदर्भ शोध आणि पदाधिकाऱ्यांची 'फिल्मी मोड' रिऍक्शन, राज ठाकरेच फसले

Har Har Mahadev

Har Har Mahadev Movie | हर हर महादेव या शिवरायांवरील चित्रपटानंतर मोठं राजकीय वादळ निर्माण झाल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. मात्र हळहळू यातील कुहेतू आणि इतिहासाची चिरफाड सत्य असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर देखील आता समाज माध्यमांवर मोठा संशय आणि संताप व्यक्त होतं आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षातील चित्रपट सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून व्हॉइस ओव्हर देण्याचं ठरवलं का? आणि तसं असेल किंवा नसेल तरी राज ठाकरेंनी व्हॉइस ओव्हर देण्यापूर्वी चित्रपटाची कथा किंवा विषय समजून घेतला होता का अशी शंका निर्माण झाली आहे. कारण, सर्व घडून गेल्यावर राज ठाकरे इतिहास तज्ज्ञांना भेटत आहेत आणि त्यामुळे याला घोड्यामागून वरात म्हणावं का अशी टीका सुद्धा होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे मनसेचे नेहमी ‘राजकीय फिल्मी मोड’ रिऍक्शन देणारे ठराविक पदाधिकारी देखील या रोषाला अधिक कारणीभूत ठरले आहेत. पिक्चर रिलीज झाल्यापासून जितेंद्र आव्हाड यांच्यावर समाज माध्यमांवर तुटून पडणारे मनसे कार्यकर्ते सुद्धा तोंडघशी पडले आहेत. आपलं बिंग फुटणार हे जेव्हा सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या ध्यानात येताच ते ‘राज ठाकरेंकडून हे शिका आणि ते शिका’ अशी टिपणी करून मागच्या दाराने वादापासून दूर झाले आणि मनसे पदाधिकारी राजकीय शौर्यात मग्न झाले. मात्र आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी देखील आक्षेप नोंदवला आणि राज ठाकरेंवर अधिक टीका होऊ लागली आहे.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप नोंदवला:
चित्रपट निर्मितीसाठी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ ही काल्पनिक चित्रपटांसाठी घेणे ठीक. मात्र, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांसाठी ती घेणे योग्य नाही. चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापरही जबाबदारीने होणे अपेक्षित आहे, ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निर्मितीत त्या जबाबदारीचे भान दिसत नाही; तसेच त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनाही दाखवण्यात आल्या आहेत, अशा शब्दांत बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी बुधवारी या चित्रपटाबाबत आक्षेप नोंदवला.

प्रा. रुपाली देशपांडे काय म्हणाल्या
बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज प्रा. रुपाली देशपांडे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. पण या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख दाखविण्यात आला आहे. तो हा असा उल्लेख टाळू शकले असते. हिरडस मावळ शिरवळ येथे त्यांनी समुद्र किनारा दाखवला आहे, पण प्रत्यक्षात इथे कुठेही समुद्र किनारा नाही. इथे निरा नदी आहे.

महाराजांनी इंग्रजांना थोपवून ठेवलं होतं आणि इथे समुद्र नाही
सोबतच इथून इंग्रज आपल्या मराठी मुलींना अगदी सहजपणे बोटीतून घेऊन जात आहेत, असं दाखविण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात त्यावेळी मावळ प्रांतात इंग्रजांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राबल्य होतं का हा मोठा प्रश्न आहे. याबाबत आपण इतिहास तज्ञ आणि लेखकांशीही चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराजांनी इंग्रजांना थोपवून ठेवलं होतं आणि इथे समुद्र नाही, हे आपल्याला देखील माहित आहे.

तिसरा आक्षेप, चित्रपट स्वातंत्र्याच्या नावाखाली बाजीप्रभू देशपांडे आणि बंधू फुलाजी देशपांडे यांच्यामध्ये लहानपणी एक तंटा दाखविण्यात आला आहे. याला विश्वासघात असं नाव दिलं आहे. फुलाजी यांनी बाजीप्रभूंचा विश्वासघात केला, असं दाखवलं आहे. पण प्रत्यक्षात या तंट्याचे कुठेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत. संदर्भाशिवाय त्यांनी हे दाखविणं योग्य नाही. यामुळे फुलाजी यांची प्रतिमा डागाळली जात आहे. प्रत्यक्षात या दोन वीर भावांची समाधी विशाळगडावर शेजारी-शेजारी आहे. हे दोघेही वीरबंधू स्वराज्यासाठी, महाराजांसाठी धारातीर्थी पडले.

अफजलखानाच्या वधावेळीही बाजीप्रभू देशपांडे तिथं हजर नव्हते. पण प्रत्यक्षात ते तिथं तंबूच्या बाहेर हजर होते आणि ते इतर लोकांना मारत आहेत, असं दाखवलं आहे. सोबतच बाजीप्रभू देशपांडे हे अफजलखानाला आमिष दाखविण्यासाठी देऊळं बांधत आहेत, हे दाखविण्यात आलं आहे. पण हे इतिहासाला धरुन आहे का? शिवा काशिद या महत्वाच्या व्यक्तीरेखेला थोडक्यात संपविण्यात आलं आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यातील वादाचे कारणही खटकणारे आहे. स्त्रियांचा बाजार आणि पाटील या वेगळ्या गोष्टींमुळे हा वाद असल्याचं दाखविण्यात आलं आहे, असे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

शिरवळ येथील स्त्रियांचा बाजार
चित्रपटात दाखवलेला शिरवळ येथील स्त्रियांचा बाजार, अफजलखान भेटीप्रसंगी बाजीप्रभूंची उपस्थिती अशा गोष्टींचा ऐतिहासिक पुरावा नाही याकडे लक्ष वेधत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो आपल्याला दाखवावा या मागणीलाही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याबाबत नाराजी देशपांडे यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे. देशपांडे कुटुंबीयांनी घेतलेल्या आक्षेपांना चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेतर्फे संपूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Har Har Mahadev Movie objection from Baji Prabhu Deshpande family reaction on social media check details 16 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Har Har Mahadev(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या