15 January 2025 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Hrithik Roshan | रितिक रोशनच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा 'हा' व्हिडिओ होत आहे वायरल - Marathi News

Highlights:

  • Hrithik Roshan
  • रितिक रोशनचा व्हिडिओ वायरल :
  • वॉर 2 या चित्रपटात कोण असेल विलन :
Hrithik Roshan

Hrithik Roshan | बॉलीवूड ॲक्टर रितिक रोशन हा सध्या त्याच्या ‘वॉर 2’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचा पाहायला मिळतोय. 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘वॉर’ या चित्रपटामधून रितिकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रितिक रोशन आणि अभिनेता टायगर श्रॉफ हे दोन धडाकेबाज कलाकार पहिल्यांदाच एकत्रित झळकले होते. दरम्यान वॉरच्या सिक्वलचा म्हणजेच वॉर 2 च्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये पाहूया.

रितिक रोशनचा व्हिडिओ वायरल :

अभिनेता रितिक रोशन हा वॉर 2 च्या शूटिंगसाठी इटलीमध्ये गेला असल्याचं समजून येत आहे. या दरम्यानचा रितिकचा स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रितिक रोशन याने डोळ्यांना काळा चष्मा सोबतच पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि त्यावर निळ्या रंगाचा जॅकेट अशा कुल लुकमध्ये रितिक पाहायला मिळतोय. त्याचा हा व्हिडिओ पाहून त्याचे अनेक चाहते भारावून गेले आहेत. सोबतच चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतोय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

वॉर 2 या चित्रपटात कोण असेल विलन :

2019 च्या वॉर या चित्रपटामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ हा निगेटिव भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये नेमकं कोण विलनच्या भूमिकेत असणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर झाला आहे.

अभिनेता रितिक रोशन याने आतापर्यंत सिनेसृष्टीला अनेक सिरीमे दिले आहे. त्याच्या 2006 च्या क्रिश या चित्रपटाचे तर, अजूनही लोक दिवाणे आहेत. अभिनेता रितिक रोशन 50 वर्षांचा झाला असून देखील तो एखाद्या तरुण कलाकाराला लाजवेल अशी त्याची बॉडी आहे.

Latest Marathi News | Hrithik Roshan Action Sequence Leak From War 2 Set 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Hrithik Roshan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x