18 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

त्या भूभागावरून मनीषा कोईराला नेपाळ सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे

India and Nepal Border, Kalapani, Lipulekh, Bollywood actress Manisha Koirala

काठमांडू, ३० जुलै : भारताच्या कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भागांवर नेपाळनं दावा केला होता. तसंच हे भाग आपल्या नकाशातही सामिल करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय अधिकाऱ्यांनी नेपाळच्या प्रशासनाला यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. तसंच नेपाळी नागरिक अवैधरित्या या प्रदेशांमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे दोन्ही देशांसाठी त्रासदायक परिस्थितीत निर्माण होईल, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. परंतु यानंतर नेपाळनंही भारताला एक पत्र लिहित भारतीयांचा अवैधरित्या होणारी ये-जा थांबवा, असा इशारा भारतानं नेपाळला दिला आहे.

हिमालयीन टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील धारचुलाचे जिल्हा आयुक्त अनिल शुक्ला यांनी १४ जुलै रोजी लिहिलेल्या एका पत्रात नेपाळ प्रशासनाला अशा प्रकारची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे लिहिण्याची विनंती केली. “या महिन्याच्या सुरुवातीला भारताने नेपाळला त्यांच्या नागरिकांना अवैधरित्या लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या भागात घुसखोरी करण्यास थांबवावं असं आवाहन केले होते. या संबंधात धारचूला(उत्तराखंड)च्या उपजिल्हाधिकारी अनिल कुमार शुक्ला यांनी नेपाळ प्रशासनाला पत्र लिहिलं होतं. आता नेपाळने या पत्राला उत्तर दिलं आहे. नेपाळच्या धारचुला भागातील मुख्य जिल्हा अधिकारी शरद कुमार यांनी दावा केला केला आहे की, लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या नेपाळचा भाग आहे.

दरम्यान, मूळची नेपाळी असणारी भारतीय चित्रपट श्रुष्टीतील अभिनेत्री मनीषा कोईराला हिने याआधीपासूनच नेपाळ सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याबाबत तिने अधिकृत ट्विट करून नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांना देखील मिशन केलं होतं. त्यामुळे इथेच सर्वकाही मिळवणारे हे अभिनेते अशा वेळी त्याचं मूळ असलेल्या देशांच्या बाजूने ठामपणे उभे राहत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.

 

News English Summary: Amid a border dispute between India and Nepal over Kalapani and Lipulekh, Bollywood actor Manisha Koirala has supported the Nepalese government’s move to show these two regions as part of its territory.

News English Title: India and Nepal over Kalapani and Lipulekh Bollywood actor Manisha Koirala has supported the Nepalese government News latest updates.

हॅशटॅग्स

#Nepal(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x