22 December 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
x

Kantara Box Office | 'कंतारा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका, हिंदीमध्ये करणार का कमाई?

Kantara Box Office

Kantara Box Office | कन्नड चित्रपट ‘कंतारा’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे आणि करत आहे. तसेच दक्षिण भारतामध्ये या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली आहे. कन्नड तसेच दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्येही या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. तर ऋषभ शेट्टी आणि सप्तमी गौडा स्टारर ‘कंतारा’ हा चित्रपटही हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांना पहायचा होता आणि आज त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे कारण या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन रिलीज झाले आहे मात्र अशा परिस्थितीत हा चित्रपट हिंदीत किती गल्ला जमवतो हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.

30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘क्या है कंतारा’ या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 100 कोटींच्या जवळ पोहोचले आहे आणि sacnilk ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाने जवळपास 75 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच चित्रपटामधील खास गोष्ट म्हणजे चित्रपटाला माउथ पब्लिसिटीचा फायदा मिळत आहे आणि हळूहळू चित्रपटाची कमाई देखील वाढत आहे.

* दिवस 1: रु 1.95 कोटी
* दिवस 2: रु 2.65 कोटी
* दिवस 3: रु 4.9 कोटी
* दिवस: रु 3.7 कोटी
* दिवस 5: रु 5 कोटी
* दिवस 6: रु 7.1 कोटी
* दिवस 7: रु 5 कोटी
* दिवस 8: रु 5.8 कोटी
* दिवस 9 : रु. 8.15 कोटी
* 10वा दिवस: रु. 9.64 कोटी
* 11वा दिवस: रु. 5.13 कोटी
* 12वा दिवस: रु. 5.08 कोटी
* 13वा दिवस: रु. 4.64 कोटी
* 14वा दिवस: रु. 4 कोटी

हिंदी पट्यामध्ये फर्स्ट डेला किती होणार कलेक्शन
‘क्या है कंतारा’ या चित्रपटाची हिंदी आवृत्ती आज 14 ऑक्‍टोबर रोजी रिलीज झाली असून, त्याची तेलुगू आवृत्ती 15 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तसेच इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत चित्रपटाची 7 हजार तिकिटे फक्त 2डी आवृत्तीमध्ये विकली गेली आहेत आणि यामुळे रात्रीच्या शोसाठीही प्रेक्षक वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘डॉक्टर जी’ आणि ‘कोड नेम तिरंगा’ या चित्रपटांना रिजील नंतर चांगले स्क्रीन्स मिळाले आहेत. तसेच व्यापार विश्लेषकांच्या मते, चित्रपट पहिल्या दिवशी 1 ते 1.5 कोटी रुपये कमवू शकतो.

चित्रपटाची कथी कर्नाटकातील किनारी संस्कृतीवर आधारित
दरम्यान, ‘क्या है कंतारा’ या चित्रपटाची कथा कर्नाटकातील किनारी संस्कृती आणि लोककथांमध्ये खोलवर रुजलेला माणूस तसेच निसर्ग यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. कांतारा या चित्रपटाच्या रिलीजवर बोलताना निर्माते विजय किरगांडूर म्हणाले की, “कंतारा हा KGF पेक्षा खूप वेगळ्या शैलीत बनलेला आहे. आम्हाला जगाला आमची वेगळी सांस्कृतिक ओळख दाखवायची होती, आणि ज्याचा आम्हाला अभिमान आहे. पवित्र प्रथा, परंपरा, छुपा खजिना आणि चित्रण यावर आधारित हा चित्रपट आहे. कोस्टल कर्नाटकच्या खडबडीत, मोहक लँडस्केपच्या पार्श्वभूमीवर पिढ्यानपिढ्याचे रहस्य दडलेले आहे.’

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Kantara Box Office record checks details 15 October 2022.

हॅशटॅग्स

Kantara Box Office(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x