15 January 2025 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Kareena Kapoor | सध्याच्या यंग ॲक्ट्रेसला देखील टाकलं मागे, करीना कपूरच्या हाती लागलाय मोठा प्रोजेक्ट - Marathi News

Highlights:

  • Kareena Kapoor
  • नुकताच ‘द बकिंघम मर्डर्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला
  • नव्या प्रोजेक्टमधील चित्रपटात अतिशय अनोखा लुक
  • आतापर्यंतची सर्वात मोठी आणि जबरदस्त फिल्म करणार
  • करीना सर्वांना बेबोचा धमाका दाखवण्यासाठी सज्ज
Kareena Kapoor

Kareena Kapoor | बॉलीवूडची बेबो म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी करीना कपूर हिने आत्तापर्यंत सिनेसृष्टी चांगलीच गाजवली. तिच्या हॉटनेसमुळे आणि जबरदस्त ॲक्टिंगमुळे तिने आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या चित्रपटांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी नाहीये. त्याचबरोबर तिचे आईटम सॉंग्सचे अजूनही लाखो चाहते आहेत.

नुकताच ‘द बकिंघम मर्डर्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला
करीनाचा नुकताच ‘द बकिंघम मर्डर्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तिला आणखीन एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर आल्याचं माध्यमांकडून समजतंय. सध्याच्या यंग ॲक्ट्रेस आलिया भट, दिशा पटानी, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, सारा अली खान या अभिनेत्रींना मागे टाकून करीना इंडियाची सर्वात मोठी आणि थ्रिलर फिल्म करणार असल्याचं समोर आलं आहे.

नव्या प्रोजेक्टमधील चित्रपटात अतिशय अनोखा लुक
काही माध्यमांच्या माहितीनुसार करीनाने हाती घेतलेल्या नव्या प्रोजेक्टमधील चित्रपटात तिचा अतिशय अनोखा लुक असणार असल्याचं समजून येतंय. अद्याप या चित्रपटाविषयी कोणतीही ठोस माहिती बाहेर आली नाहीये. किंवा चित्रपटाचं नाव देखील अजून समजलं नाहीये. परंतु करीनाला नेहमीपेक्षा एक या वेगळ्या रंगात आणि ढंगात पाहायला प्रेक्षकांना आवडणार आहे.

आतापर्यंतची सर्वात मोठी आणि जबरदस्त फिल्म करणार
करीना आतापर्यंतची सर्वात मोठी आणि जबरदस्त पॅन इंडिया फिल्म करणार असल्याचा दावा केला गेलाय. माध्यमांकडून अशी देखील माहिती समोर आली आहे की, करीनाच्या या नव्या चित्रपटाची शूटिंग 2025 मध्ये सुरू होऊन 2026 ला चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार आहे. त्याचबरोबर करीनाच्या आगामी चित्रपटामध्ये साउथ ॲक्टर झळकणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. त्याचबरोबर बॉलीवूडमधील नावाजलेले कलाकार देखील दिसणार आहे.

करीना सर्वांना बेबोचा धमाका दाखवण्यासाठी सज्ज
अनेक दिवसानंतर करीना सर्वांना बेबोचा धमाका दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. करीना बद्दल सांगायचं झालं तर ती, सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळा तिच्या योगा आणि व्यायामादरम्यानच्या अनेक व्हिडिओज आणि फोटोज वायरल होत असतात. त्याचबरोबर तिचा एका शूट दरम्यानचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये करीना आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसली आहे आणि मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत आहेत. असा हा करीनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर वायरल झाला आहे.

Latest Marathi News | Kareena Kapoor Signed India Biggest Pan Film 19 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Kareena Kapoor(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x