22 January 2025 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

VIDEO | प्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्याच्य खांद्यावर खेळ | अन अशी पडली

Kavita Kaushik, Husband Ronit Biswas, Viral video

मुंबई, २१ फेब्रुवारी: एफआयआर या टीव्ही शो मध्ये इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटालाची भूमिका खूप लोकप्रिय झाली आहे. हे पात्र साकारणारी कविता कौशिक सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टीव्ह असते. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत कविता कौशिकचा तिचा पती रोनित बिस्वास याच्यासोबत दिसत आहे. त्यामध्ये ती रोनितसोबत योग करत आहे. व्हिडिओमध्ये कविता कौशिकचा नवरा जमिनीवर बसलेला दिसतो आणि कविता त्याच्या मागे उभी राहिली आहे. यानंतर कविता त्याच्या खांद्यावर चढण्याचा प्रयत्न करते. परंतु कविताचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने ती खाली आपटते.

व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री कविता कौशिकने त्याला छान कॅप्शन दिले आहे. ती लिहिते की, कोणीही त्यांचे अपयश सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. हे तुम्ही जे पाहात आहात हेच चित्र खरं आहे. आयुष्यात तुम्ही पडा मग उठा आणि उभे रहा. आयुष्य असेच काहीसे आहे यश आणि अपयशांनी भरलेले. यात प्रत्येक वेळी आपण नवीन सुधारणा करतो.

तसेच, कविता या पोस्टमध्ये गंमतीने लिहते, व्हिडीओतील अपयश फक्त जेव्हा तुम्ही सकाळी नाश्त्याला भरपूर पराठे खाल्ले तरच येते. कविताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.

 

News English Summary: In this viral video, Kavita Kaushik is seen with her husband Ronit Biswas. In it, she is doing yoga with Ronit. In the video, Kavita Kaushik’s husband is seen sitting on the ground and Kavita is standing behind him. After this the poem tries to climb on his shoulders. But this attempt of poetry fails and it falls down.

News English Title: Kavita Kaushik is seen with her husband Ronit Biswas doing yoga viral video news updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x