14 January 2025 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

सोनी टीव्ही वाहिनीने खोडसाळपणे केलं आणि बोल बच्चन यांनी अक्कल गहाण ठेवली होती

chhatrapati shivaji maharaj, KBC 11, SONY TV, Bollywood Super Star Amitabh Bachchan

मुंबई: अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला आहे. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

नुकत्याच प्रसारित झालेल्या KBC च्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला. त्यामुळे नाराजी पसरली आहे आणि बिग बींनी यासाठी माफी मागावी अशी मागणी होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केल्याचे म्हणत शिवप्रेमींनी अमिताभ बच्चन यांना जाब विचारत त्यांच्यावर ताशेरे ओढले. कौन बनेगा करोडपतीच्या मागील शोमध्ये स्पर्धकाला मुघल बादशाह औरंगजेबाबाबत प्रश्न विचारण्यात आला. मुघल बादशाह औरंगजेब याच्या समकालीन खालीलपैकी कोण होते? असा प्रश्न स्पर्धकासाठी स्क्रीनवर आला. या प्रश्नाचे ४ पर्याय देण्यात आले होते. त्या ४ पर्यायांमध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज असे पर्याय देण्यात आले होते. डी या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. अमिताभ यांनी देखील पर्याय सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरीच उल्लेख केला. विशेष म्हणजे प्रश्नात औरंगजेब याचा सम्राट असा उल्लेख करण्यात आला होता. या मुळे लोकांमध्ये नाराजी पसरली.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी या प्रकरणाबद्दल संघटनेची भूमिका स्पष्ट केली. “केबीसीमध्ये जाणीवपूर्वक खोडसाळपणे उत्तरांच्या पर्यायांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ उल्लेख फक्त ‘शिवाजी’ असा ‘एकेरी’त केला गेला. हे निषेधार्ह आहे. महाराजांची बदनामी करणाऱ्या बच्चन, सोनी वाहिनी आणि संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला होता. औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का?, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. ट्विटरवर नेटिझन्स #boycottKBC हा हॅशटॅश सुरु करुन ‘कौन बनेगा करोडपती-११’ न पाहण्याचं आवाहन करत आहेत.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x