19 April 2025 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

Manmauji Movie Release Date

Manmauji Movie Release Date | काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सायली संजीव आणि हॉट, बिंदास्त अभिनेता भूषण पाटील अभिनीत ‘मनमौजी’ या सिनेमाचा टीजर लॉन्च करण्यात आला होता. दरम्यान या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली असून, अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर धरलं आहे. अनेकजण चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवत आहेत. कारण की या आगामी चित्रपटाची कथाच काहीशी निराळी आहे.

चित्रपटाची कथा :
आता ‘मनमौजी’ हे नाव ऐकून कोणालाही हेच वाटेल की, आपल्या मनाचा ऐकणारा किंवा आपली मनमानी करणारा. परंतु या चित्रपटामध्ये आपल्याला एक वेगळीचं रंजक स्टोरी पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये एक स्टायलिश, हॉट, सिक्स पॅक असणारा हँडसम तरुण दाखवला गेलाय. त्याला पाहून अनेक महिला अट्रॅक्ट होताना दिसणार आहेत. लॉन्च झालेल्या टीझरमध्ये तरुण जॉगिंग दरम्यान पळताना दिसतोय. कशातच त्याच्या हॉटनेसला आकर्षित होऊन सर्व महिला त्याच्याजवळ येत आहेत. परंतु, महिलांपासून चार हात लांब राहणारा हा तरुण दाखवला गेलाय. त्याला महिला अजिबात आवडत नाहीत. तरीसुद्धा त्याच्याजवळ महिला येऊ पाहत आहेत. तर अशा पद्धतीची ही रंजक, विनोदी आणि प्रेमाच्या रंगांनी भरलेली स्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

चित्रपटाची रिलीज डेट :
या चित्रपटाची निर्मिती ‘विनोद मलगेवार’ यांनी केली असून, त्यांनी याआधी ‘गुलाबजाम’आणि ‘लॉस्ट अँड फाउंड’ अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. दरम्यानु चित्रपटांमध्ये अभिनेता भूषण पाटील, अभिनेत्री सायली संजीव, रुपेरी पडदावर प्रथमच पदार्पण करणारी रीया नलावडे, अरुण नलावडे, जयवंत वाडकर आणि भाऊ कदम हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत झळणार आहेत. चित्रपटाला कार्यकारी निर्माता म्हणून लेखक आणि संपादक संदीप काळे याचं देखील सहकार्य लाभलं आहे. अशातच येत्या 8 नोव्हेंबर 2024 ला मनमौजी हा चित्रपट प्रेक्षकांना जवळील चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

चित्रपटाच्या रंजक स्टोरीमुळे अनेकजण चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत. त्याचबरोबर चित्रपटाची स्टार कास्ट देखील तगडी असल्यामुळे अनेकांनी चित्रपटाच्या बजेटचा अंदाज देखील बांधला आहे. केवळ तरुणच नाही तर, संपूर्ण वयोगटातील पुरुषांना हा चित्रपट आवडणार आहे. चित्रपटाच्या रिलीजआधीच चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

Latest Marathi News | Manmauji Movie Release Date 12 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Manmauji Movie Release Date(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या