22 January 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Mili Teaser Out | जान्हवी कपूरचा नवा लुक पाहून व्हाल थक्क, 'मिली' चित्रपटाचा टीझर रिलीज

Mili Teaser Out 

Mili Teaser Out  | चाहत्यांसाठी जान्हवी कपूर नवीन चित्रपट घेऊन येत आहे. जान्हवीचा मिली चित्रपटामधील फर्स्ट लुक 12 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. तसेच पोस्टरमधील जान्हवी कपूरचा लूक तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप आहे. तित्रपटाचे पोस्टर जर तुम्ही पाहिले तर या पोस्टरमध्ये ती तिच्या खऱ्या व्यक्तिरेखेच्या अगदी जवळ दिसून येत आहे तसेच पोस्टरवर चित्रपटाचे नाव लिहिले असून जान्हवी कपूर या मध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. यासोबतच आज मॅक्सने मीली चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे.

मिली चित्रपटाचा टीझर झाला आऊट
जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘मिली नौटियाल’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. तसेच ती या चित्रपटामध्ये नर्सिंग ग्रॅज्युएटची भूमिका साकारणार आहे. टीझर जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, ती चिकन हबमध्ये फ्रीझर रूममध्ये अडकते. तसेच या चित्रपटात जान्हवी कपूर व्यतिरिक्त मनोज पाहवाचा तसेच विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशल देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटामध्ये सनी, जान्हवीच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार आहे आणि त्याचबरोबर जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत मनोज पाहवा दिसून येणार आहेत. माली चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि मथुकुट्टी झेवियर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे.

जान्हवी कपूरचा नवा अंदाज
मिली चित्रपटामध्ये लवकरच जान्हवी कपूर दिसून येणार आहे. जान्हवी शेवट गुड लक जेरी या चित्रपटात दिसून आली होती आणि त्याआधी ती रुही या चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, मिली व्यतिरिक्त जान्हवी मिस्टर अँड मिसेस माही आणि बवल या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. जान्हवी कपूरने 2008 मध्ये धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर ती गुंजन सक्सेनामध्ये पडद्यावर दिसली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mili Teaser Out checks details 13 October 2022.

हॅशटॅग्स

Mili Teaser Out(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x