5 November 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

अखेर अक्षय'ची माघार; ’मिशन मंगल’ मराठीत डब न करण्यावरून होता वाद

Mission Mangal, MNS, Ameya Khopkar

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने त्याचा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्हमधून त्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतल्याचे जाहीर केले.

“मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी आतापर्यंत आंदोलन करत आलो. आता तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. १५ ऑगस्टला अक्षय कुमार यांचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा जगामध्ये हिंदीत प्रदर्शित होत आहे, तो महाराष्ट्रात हिंदीसह मराठीतही प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेतील ‘मिशन मंगल’ला आमचा विरोध नाही, पण मराठीत डब करण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे. इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी करायचं काय?” असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला.” इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मनचिकसे मोठं आंदोलन उभं करेल. सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील. चित्रपटगृहांच्या मालकांनाही ते परवडणार नाही.’मिशन मंगल’ हा चित्रपट मराठीत डब करण्यापेक्षा कलाकारांसोबत रिशूट करा. त्याला आमचा विरोध नाही.

महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिक जनतेला हिंदी भाषा समजण्यात काहीही अडचण नाही, असं असताना मूळ हिंदी मराठी भाषेत डब करणे यामागचा तर्क केवळ थिएटरमालकांचा वर्षभरातील मराठी सिनेमांच्या शोजचा कोटा पूर्ण व्हावा असाच आहे. मराठी चित्रपट व्यवसायाची परिस्थिती अशाने आणखी बिकट होऊ शकते, म्हणूनच वेळीच त्याविरोधात आवाज उठवणं गरजेच आहे.

यापूर्वी धोनी सिनेमासुद्धा मराठी भाषेत डब करुन प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला होता पण मनसे आंदोलनाने तो हाणून पाडला होता. एका मराठी मनोरंजन वाहिनीने दाक्षिणात्य सिनेमे मराठीत डब करुन टीव्हीवर दाखवण्यास सुरुवात केली होती, तोही प्रकार मनसेच्या प्रयत्नाने बंद झाला होता.

‘विशिष्ट सिनेमाला आकसाने विरोध करण्याचा आमचा मानस नाही. हिंदी ‘मिशन मंगल’ या चित्रपटाला मनसेच्या शुभेच्छाच आहेत… पण त्याचवेळी आम्ही हेही जाहीर करतो की ‘मिशन मंगल’ मराठीत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झालाच तर मग आम्हालाही ‘मिशन खळ्ळखटॅक’ हाती घ्यावं लागेल.’ अमेय खोपकर (अध्यक्ष, मनसे चित्रपट सेना) यांनी सांगितलं.

आमचा केवळ मराठीत डब करून रिलीज करायला विरोध आहे. जर ‘मिशन मंगल’ मराठीत डब करून हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला, तर हिंदी चित्रपटही रिलीज होऊ देणार नाही,” असे खोपकर यांनी फेसबुक लाइव्हद्वारे स्पष्ट केले. दरम्यान, अमेय खोपकर यांनी मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित करण्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमारने आपला निर्णय बदलला. मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित होणार नसल्याचे त्याने जाहीर केले.

गैरसमजातून वाद;

‘महिला सबलीकरणाचा नारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, यासाठी अधिकाधिक भाषांमध्ये त्याचं डबिंग करण्याचा चित्रपट निर्मात्यांचा मानस आहे. मात्र अख्खा चित्रपट मराठीत डब करण्याच्या गैरसमजातून मनसेने विरोधाचं अस्त्र उगारलं’ असंही चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं.

2013 मधील ‘इस्रो’च्या महत्त्वाकांक्षी ‘मंगलयान’ प्रकल्पावर या चित्रपटाचं कथानक आधारित आहे. अक्षय कुमारने ज्येष्ठ वैज्ञानिक राकेश धवन यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. अक्षयसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, शर्मन जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x