23 February 2025 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भावाच्या लग्नानंतर शूटिंगला | आता फायनल अल्टीमेटमनंतर हजर न झाल्यास अटक?

Mumbai Police, third summons, actress Kangana Ranaut

मुंबई, २३ नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला आज (23 नोव्हेंबर) वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर व्हायचे आहे. कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स (Third Summons) बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून, आताही कंगना अनुपस्थितीत राहिल्यास तिला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान या पोलिस तपासात कंगना रनौतने सहकार्य न केल्यास तीच्या कायदेशीर कारवाईला शक्य असल्याचे असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Senior Lawyer Ujjwal Nikam) यांनी मांडले. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना उज्ज्वल निकम पुढे म्हणाले होते की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना राणावतला दोन वेळा समन्स बजावले. तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कंगनाने या समन्सचे उल्लंघन केले तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात. जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते. अर्थात पोलीस याकरता तिला त्वरित अटक देखील करू शकतात. मुंबई पोलीस ऍक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करू शकतात, असे मतही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले होते.

 

News English Summary: Bollywood actress Kangana Ranaut is scheduled to appear at the Bandra police station today (November 23) for questioning. Kangana Ranaut was summoned twice after a case was registered against her at the Bandra police station. However, she was absent both times for personal reasons. She was then served a third summons. The third summons is a “final ultimatum” and Kangana is still being held in absentia.

News English Title: Mumbai Police third summons and final ultimatum to actress Kangana Ranaut News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x