15 January 2025 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Ponniyin Selvan I | दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार

Ponniyin Selvan I

Ponniyin Selvan I | अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. तमिळी भाषेतील पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे आज ट्रेलर लॉंच होणार आहे. आजचा दिवस या टीम साठी सर्वांत मोठा दिवस असणार आहे. दरम्यान, पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी लॉंच करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.

चित्रपटातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती
पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे ट्रेलर आणि गाणे लॉंच करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणारी तृषा, अभिनेते विक्रम, ऐश्वर्या राय, सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन या दिग्गज कलाकारांनी या भव्य कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. ट्रेलर पुर्वी टीझर आणि गाणी रिलीज करण्यात आले होते. दरम्यान, ट्रेलर लॉंच होताच काही वेळामध्ये चाहत्यांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

कथा कल्की कृष्णमूर्ती नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट
पोन्नियिन सेल्वन चित्रपट कथा कल्की कृष्णमूर्ती नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट चोल वंश चे राजराजा चोल पहिले यांच्या आयुष्यावर आधारित हा पोन्नियिन सेल्वन चित्रपट असणार आहे. दरम्यान, चित्रपटामध्ये नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन, आदित्य करिकलनच्या भूमिकेत विक्रम, वंथियाथेवनच्या भूमिकेत कार्ती, कुंदावईच्या भूमिकेत त्रिशा आणि अरुणमोझी वर्मनच्या भूमिकेत जयम रवी झळकणार आहे.

पोन्नियिन सेल्वन चित्रपट 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल
प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी पोन्नियिन सेल्वन चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये ए आर रहमान यांचे संगीत आहे. तसेच हा चित्रपट दोन भागांमध्ये बनवण्याची योजना आखली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ponniyin Selvan I song and trailer launch Checks details 7 September 2022.

हॅशटॅग्स

Ponniyin Selvan I(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x