22 April 2025 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Pre-Release Brahmastra | आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग, अवघ्या 4 मिनिटात संपुर्ण चित्रपटगृह फुल

Pre-Release Brahmastra

Pre-Release Brahmastra | बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे 2 दिवसच बाकी आहेत. चाहत्यांच्या उत्सुकतेला लवकरच अनुस्वार लागणार आहे. याचित्रपटामध्ये सर्व दिग्गज कलाकार एकत्र एका स्क्रिनवर दिसून येणार आहेत. दरम्यान, चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. धर्मा प्रोडक्शनने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये, आलिया- रणबीर दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि चित्रपटाची संपुर्ण स्टारकास्ट थेटरमध्ये बसल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीजच्या एक दिवस आधी विशेष प्री-रिलीज शोची माहिती देण्यात आली आहे.

रणबीर आलिया आणि अयान शोमध्ये उपस्थित राहणार
चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी संपत नाही तो पर्यंत आणखी एक बातमी समोर आली आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे की, 8 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या या शोमध्ये रणबीर आलिया आणि अयान उपस्थित असणार आहेत. व्हिडीओमध्ये आलियाने सांगितले की, या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉलमध्ये होणार आहे. दरम्यान चा चित्रपटासाठी बुकींग सुरु झाले असल्याचेही यालवेळी सांगण्यात आले आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत
चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचा व्हिडीओ शेअर करताच अवघ्या मिनिटांनध्ये शोची सर्व तिकीटे विकली गेली. चित्रपटाची तिकीटे विकण्यासाठी 1 तास वेळ गृहीत धरण्यात आला होता मात्र 4 मिनिटाच्या आतच 315 सीटर स्क्रिन फुल झाली. याचे कारण म्हणजे यावेळी चाहत्यांना रणबीर आलिया लाईव्ह पहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

चित्रपटाचे प्री-रिलीज स्क्रीनिंग
दरम्यान, चाहत्यांचा प्रतिसाद बघता निर्माते आणि पीव्हीआर ओबेरॉय मॉलमध्ये चित्रपटाचे आणखी एक स्क्रिनिंग आयोजित करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pre-release of the movie Brahmastra Checks details 7 september 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Pre-Release Brahmastra(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या