23 November 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Nitanshi Goel | 'फुल कुमारीने' सांगितलं स्वतःच्या लांबसडक आणि सुंदर केसांचं रहस्यं; किचनमधील या गोष्टींचा करते वापर

Nitanshi Goel

Nitanshi Goel | प्रत्येक महिलेला आपले केस लांबसडक आणि काळेभोर असावे असं वाटत असतं. रुपेरी पडल्यावर काम करणाऱ्या हीरोइनसारखे आपले केस कधी होणार? या विचारात सर्वसामान्य महिला जगत असतात. दरम्यान वेगवेगळे डाय आणि हेअर कलर करून स्वतःच्या केसांचा सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतात. परंतु केमिकल युक्त प्रॉडक्टमुळे तुमचे केस दीर्घकाळ सुंदर दिसत नाहीत आणि डॅमेज होण्याचे देखील चान्सेस असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या केमिकल्स प्रॉडक्टपासून लांब रहा.

आज आम्ही तुम्हाला एका अभिनेत्रीच्या केसांचं रहस्य सांगणार आहोत. सात महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘लापता लेडीज’ मधील निशांती म्हणजेच आपली ‘फूलकुमारी’ हिने यूट्यूबमार्फत स्वतःच्या सुंदर केसांचा रहस्य प्रेक्षकांना सांगितलं असल्याचं समजतंय. फुल कुमारी म्हणजेच नितांशी आपल्या केसांच्या चमकदारपणासाठी किचनमधील या गोष्टींचा वापर करते. चला तर जाणून घेऊया फूलकुमारीच्या लांबसडक आणि चमकदार केसांमागचं सरहस्य.

नितांशी आपल्या केसांना शाम्पू करताना किचनमधील काही खास गोष्टींचा वापर करते. यामध्ये ती एक मॅजिकल शाम्पू तयार करते. हा शाम्पू तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये शाम्पू त्यानंतर किचनमध्ये अगदी सहजरीचा उपलब्ध होणारे कढीपत्ता, लिंबू, फ्रेश एलोवेरा आणि साखर घेते. हे संपूर्ण मिश्रण मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच शाम्पूने केस धुवायचे आहेत. केस धुण्याआधी शाम्पूमध्ये थोडसं पाणी ऍड करून वापरायचा आहे. या मॅजिकल शॅम्पूमुळे तुमचे सुद्धा केस फुल कुमारीसारखे सुंदर दिसण्यास मदत होईल.

फूलकुमारी या रेमेडीचा वापर सातत्याने करते. तिच्या म्हणण्याप्रमाणे जर तुमचे केस अधिक प्रमाणात गळत असतील तर तुमच्यासाठी हा शाम्पू वरदान आहे. हा शाम्पू फक्त हेअर कंट्रोल करत नाही तर, तुमचे केस अतिशय स्मूथ आणि शायनी देखील बनवतो. नितांशी ही रेमेडी आपल्या केसांना आठवड्यातून दोनदा लावते. जर तुम्हाला जास्त हेअर फॉलचा त्रास असेल तर तुम्ही आठवड्यातून तीनदा देखील ही रेमेडी वापरून पाहू शकता.

Latest Marathi News | Nitanshi Goel Facts 09 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Nitanshi Goel(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x