महत्वाच्या बातम्या
-
सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन
सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.
4 वर्षांपूर्वी -
कोणत्याही सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घेताना आनंद वाटत असेल का? - नाना पाटेकर
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
महाभारत मालिकेतील इंद्रदेव आणि अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनामुळे निधन
बीआर चोप्रा यांच्या अत्यंत लोकप्रिय ‘महाभारत’मध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे हिंदी आणि पंजाबी अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन झाले. एका आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्हवर आल्यानंतर त्यांना लुधियाना येथील श्री रामा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते 72 वर्षांचे होते.
4 वर्षांपूर्वी -
पहचान कौन? असं ट्विट करणाऱ्या अमृता फडणवीसांना शिवसैनिकाने दिलं असं उत्तर की हसून.....
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच ठाकरे सरकारवर बोचऱ्या टीका करताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर, अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह आणि ठाकरे सरकारवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू | नाट्यगृहांबाबत कलाकारांची मुख्यमंत्र्यांना विनंती
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या अभिनेत्याचं मनसेतर्फे मनापासून अभिनंदन - राज ठाकरे
सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूत मतदानाला 5 दिवस शिल्लक | केंद्र सरकारकडून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली. 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
#GlobalFekuDay | एप्रिल फूल्स डे आणि नरेंद्र मोदी | सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
आज एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल्स डे. या दिवशी लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. कारण, या दिवशी अनेकजण इतरांना एप्रिल फुल बनविण्यासाठी काहीना ना काही कुरापत्या करून टोप्या लावण्याचे गमतीने प्रयोग करतात. २०१४ मध्ये देखील सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशाला अनेक वचनं आणि आश्वासनं दिली होती. मात्र त्यानंतर २ वेळा पंतप्रधान पद मिळूनही परिस्थिती नेमकी विरुद्ध झाली आहे. त्यात ज्या मुद्यांवर मोदी सरकार सत्तेत आलं होतं ते महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव, बेरोजगारी आणि इतर अनेक विषयांवर स्वतः नरेंद्र मोदी भाष्य देखील करत नाहीत. त्यामुळे आजचा दिवस भारतीय नेटिझन्स वेगळ्याप्रकारे साजरा करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गायिका वैशाली माडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश | विदर्भातील पक्षबांधणी
लोकप्रिय गायिका वैशाली माडे आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. 31 मार्चला वैशाली मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार. वैशाली यांनी अनेक चित्रपटांत गाणी आणि मराठी मालिकांची ‘टायटल साँग’ देखील गायली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक व नम्र आहेत - सोनू सूद
सोनू सूद याला आज ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्तुती केली. तसेच विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर उत्तरं देखील दिली. यावेळी अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
4 वर्षांपूर्वी -
हृतिक आणि कंगनाची धमकी ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं
मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | आर्चीचा परशा उतरला कुस्तीच्या मैदानात | पैलवानाला उचलून आपटला
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला आकाश ठोसर हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं सैराटमध्ये साकारलेलं परश्या हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. अकाशऐवजी त्याला आता परश्या म्हणूनच चाहते ओळखतात यावरुनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र कितीही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला तरी आकाशने आपले पाय मात्र जमिनीवरच ठेवले आहेत. आजही तो गावातील मित्र-मंडळींसोबत कुस्ती खेळायला जातो. दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Jhimma Movie Teaser | झिम्मा मराठी सिनेमाचा टीझर | 23 एप्रिलला प्रदर्शित होणार
लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर आता हळूहळू जनजीवन स्थिरावत आहे. सिनेसृष्टी देखील पुन्हा रूळावर येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत ‘झिम्मा’ या आगामी सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. हेमंत ढोमे याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्या पोस्टर नंतर आज त्याने टीझर शेअर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस घेतल्याने सैफ अली खान ट्रोल | तो वरिष्ठ नागरिक आहे का?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात लस घेतली आहे. मात्र त्याने लस घेतल्यानंतर त्याला समाज माध्यमांवर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलीवूड कलाकारांना किंमत चुकवावी लागतेय - शिवसेना
आयकर विभागाने बुधवारी मुंबई आणि पुण्यातील 4 बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर आणि ऑफिसवर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना हे चार सेलिब्रिटी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सलग दुस-या दिवशीदेखील ही कारवाई सुरु होती. पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
बॉलिवूडकरांवर आयकर विभागाच्या धाडी | अनेक मोदी विरोधक कलाकार रडारवर?
आयकर विभागाने मुंबईत अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मोदी आणि मोदी समर्थकांचे विरोधक असणारे कलाकार यामध्ये अधिक असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वयंघोषित फिल्मी झाशीची राणी कंगनाला शिवसैनिकांची भीती वाटतेय | असं पाऊल उचललं....
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आलेले तिन्ही खटले हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात हलवण्यात यावे अशी मागणी कंगनाने केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा कंगना राणावतने केला आहे. कंगनावर सध्या ३ खटले सुरू आहे. वादग्रस्त ट्वीट केल्या प्रकरणी कंगनावर खटलाही सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
फँड्री फेम जब्या | सोमनाथ अवघडे'चं नवीन रोमँटिक गाणं 'रंग प्रीतीचा बावरा'
Rang Pirticha Bawara Song, फँड्री फेम जब्या उर्फ सोमनाथ अवघडे’चं नवीन रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ‘फ्री हिट दणका’ या सुनिल मगरे दिग्दर्शित चित्रपटातील आहे. हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ या गाण्यात अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे यांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे. यात हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे. तसेच संजय नवगिरे यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेला आणि ‘लूट लिया रे’....भन्नाट व्हायरल
देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा चांगलाच भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दराने प्रति लीटर शंभरीचा टप्पा गाठला आहे. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला याची मोठी झळ पोहोचली आहे. सामान्य माणसासाठी पेट्रोल भाव प्रचंड झाल्याने महागाईचा देखील सामना करावा लागत आहे. आता याबाबत समाज माध्यमांवर देखील सद्यस्थिती सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | महिला डॉक्टरांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल | काय कारण?
समाज माध्यमांवर अनेक फोटो, व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. समाज माध्यमांवरील युजर्स यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया देत असतात. समाज माध्यमांवर अनेक मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक डॉक्टरांचा डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता सहा महिला डॉक्टर वेगवेगळ्या कलरचे स्क्रब घालून एक एका इंग्रजी गाण्यावर धमाल डान्स करत आहेत. डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL