महत्वाच्या बातम्या
-
सलमान खानच्या हत्येचा कट | शार्प शूटरला अटक
अभिनेता सलमान खान चाहते जगभरात आहे, मात्र त्याच्यासोबत शत्रुत्व असणारेही कमी नाही आहेत. यातूनच एक धक्कादायक प्रकार घडणार आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, पोलिसांनी या शार्प शुटरला अटक केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंबाबत रिया चक्रवर्तीकडून अधिकृत खुलासा | वकिलांमार्फत निवेदन प्रसिद्ध
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एका युवा मंत्र्यांच्या दबावामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता याप्रकरणी अखेर रिया चक्रवर्तीने खुलासा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड
‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ५० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
त्यांना डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं म्हणाले | मग म्हणाले डॉक्टरांना काही कळत नाही - केदार शिंदे
मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाही. शाब्दिक कोटी आणि अपमान यांच्यातला फरक आपल्याला कळायला हवा, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंपाऊडरला डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असते, अशा आशयाचे विधान केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटना आक्रमक झाल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतने फ्लॅट घेऊन दिल्याचा आरोप झाला | अंकिताने दिले पुरावे आणि....
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांचा साडेचार कोटींचा फ्लॅटचा ईएमआय अभिनेता स्वत: भरत असल्याचा एक नवीन खुलासा समोर आला आहे. पण, आता स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियावर या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले असून पुरावे दाखवून सत्य दाखविले आहे. अंकिताने बँक स्टेटमेंट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि म्हटले की फ्लॅटची देयकेची ही बाब चुकीची आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांची कसून चौकशी करा - सुब्रमण्यम स्वामी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी आणखी एक खळबळजनक दावा केला. सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी नेला जात असताना त्याचा घोट्याखालील पाय फिरलेला (तुटल्यासारखा) होता. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांकडून ही माहिती पुढे आली होती. त्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांची कसून चौकशी केली पाहिजे. त्याशिवाय, या प्रकरणाचा गुंता सुटणार नाही, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात | सुशांतच्या वडिलांकडून कोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती मुख्य आरोपीच्या जाळ्यात अडकल्याचे दृष्य समोर येत आहे. या प्रकरणी ईडीने रियाची तब्बल ८ तास चौकशी केली. त्यानंतर आता तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ईडीकडून शोविकची देखील चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ईडी कडून चौकशी करण्यात ही चौकशी जवळपास १८ तास सुरू होती.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याने त्याचे वडिलांशी चांगले संबंध नव्हते - संजय राऊत
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच ‘नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली’ असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग प्रकरण | राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर, CBI चौकशीला विरोध
अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला विरोध केला आहे. महाराष्ट्र सरकारने सील बंद लिफाफ्यात चौकशी कुठपर्यंत आली याबाबतची माहिती देण्यात आली. सुशांतसिंग प्रकरणी बिहार सरकारने नियमांविरुद्ध जाऊन काम केलं, असा आरोप महाराष्ट्र सरकारने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंकिता भावूक | शेअर केला सुशांतच्या आईचा फोटो
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारण देखील तसचं आहे. अंकिताने सुशांतच्या आईसोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच दिवसांनंतर ती पुन्हा आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहे. सध्या अंकिताने सुशांतच्या आईसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिशा सालियनची आत्महत्या की खून झाला | मैत्रिणीने सांगितलं नेमकं काय घडलं त्यादिवशी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले होते. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
टकटक गँग | अभिनेते भारत गणेशपुरे यांनी अनुभवला एक वाईट प्रसंग
तुमची गाडी सिग्नलवर उभी असेल, तर टकटक करून लक्ष वेधून घ्यायचे आणि तुमच्या किंमती वस्तू लंपास करायच्या, अशी शक्कल लढवण्यात टकटक गँग माहीर असते. मात्र आता तेवढ्यापुरते आपले हस्तकौशल्य न दाखवता थेट आयफोनची आंतरराष्ट्रीय सुरक्षा भेदून फोनमधला पूर्ण डाटाच डिलिट करण्यापर्यंत ही टोळी हायटेकही झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीत असोसिएट व्हाइस प्रेसिडेन्ट पदावर असलेल्या ३२ वर्षांच्या तरुणास ठाण्यातील मानपाडा पुलावर अशा फसवणुकीचा फटका बसला होता.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | रियाची ईडी कार्यालयात संध्याकाळपर्यंत चौकशी होण्याची शक्यता
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | सीबीआयकडून SSR आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात FIR
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. ज्यानंतर त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी करण्यात आला. सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार आता हे संपूर्ण प्रकरण CBI च्या हाती गेलं असून, सुशांतची प्रेयसी आणि त्याच्यासमवेत एकेकाळी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने रियाची प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका फेटाळली, बिहार पोलिसांचा मार्ग मोकळा
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दरदिवशी नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. केंद्र सरकारने सीबीआय चौकशीला परवानगी दिल्यानंतर अचानक या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. ईडीने देखील रियाला चौकशीसाठी समन्स पाठवले असून तिचा सहकारी सॅम्युअलची ईडी चौकशी करत आहेत. सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बिहार पोलिसांचे पथक रियाची चौकशी करू शकते.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरणाचा तपास CBI मार्फत होणार, बिहार सरकारची शिफारस केंद्राकडून मान्य
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता पुन्हा नवं वळण मिळालं आहे. सुशांत सिंहच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप सुरू असून, बिहार सरकार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली होती.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण: अमृता फडणवीस यांची पुन्हा अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका
असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावं असं शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीस यांनी तपास ज्याप्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी टीका केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं, तीने आत्महत्या केली नाही - नारायण राणे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस मुख्यमंत्री असताना असं घडलं असतं तर मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं - रेणुका शहाणे
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. असं असताना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी यांनी ‘मुंबई सुरक्षित नाही’ असं म्हणतं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर ट्विट केलं आहे. या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांकडून शोध सुरु
अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्या प्रकरणात सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येचे काही कनेक्शन आहे का, हे तपासण्यासाठी पाटणा पोलिसांचे पथक शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात अचानक धडकले. मात्र तपास अधिकाऱ्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांना खाली हात परतावे लागले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल