महत्वाच्या बातम्या
-
दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं, तीने आत्महत्या केली नाही - नारायण राणे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस मुख्यमंत्री असताना असं घडलं असतं तर मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं - रेणुका शहाणे
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. असं असताना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी यांनी ‘मुंबई सुरक्षित नाही’ असं म्हणतं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर ट्विट केलं आहे. या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांकडून शोध सुरु
अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्या प्रकरणात सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येचे काही कनेक्शन आहे का, हे तपासण्यासाठी पाटणा पोलिसांचे पथक शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात अचानक धडकले. मात्र तपास अधिकाऱ्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांना खाली हात परतावे लागले.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत आत्महत्या : बिहार पोलीस तपास अधिकारी मुंबई पालिकेकडून होम क्वारंटाईन
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलंय. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट केल्याचे बिहार पोलिसांचे म्हणणे आहे. बिहार पोलिसांचा तपास रोखण्यासाठी हे जाणिवपूर्वक पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
5 वर्षांपूर्वी -
अक्षय, आदित्य ठाकरे आणि पोलीस आयुक्तांची भेट, निराधार वृत्त प्रसिद्ध
अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी fitness- health tracking devices भेट दिली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी फेसबूकद्वारे दिली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत या तिघांची बैठक झाली.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरणाचा वापर महाराष्ट्र व बिहार दरम्यान वाद निर्माण करण्यासासाठी करू नका - उद्धव ठाकरे
छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत अनेकांचा जबाब नोंदवला गेला आहे. याच दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनी लॉन्ड्रिंगच्या आडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडी'ची उडी
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडिल केके सिंग यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरुद्ध तक्रार केली होती. ईडीने बिहार पोलिसांकडून याप्रकरणाची माहितीही मागवली. सुशांतच्या बँक अकाऊंटमधून २५ कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत बिहार पोलिसांकडून माहिती मागवल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या भूभागावरून मनीषा कोईराला नेपाळ सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे
भारताच्या कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भागांवर नेपाळनं दावा केला होता. तसंच हे भाग आपल्या नकाशातही सामिल करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय अधिकाऱ्यांनी नेपाळच्या प्रशासनाला यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. तसंच नेपाळी नागरिक अवैधरित्या या प्रदेशांमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे दोन्ही देशांसाठी त्रासदायक परिस्थितीत निर्माण होईल, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. परंतु यानंतर नेपाळनंही भारताला एक पत्र लिहित भारतीयांचा अवैधरित्या होणारी ये-जा थांबवा, असा इशारा भारतानं नेपाळला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतला ब्रेकअप करायचा होता म्हणून रियाकडून त्याचा छळ, अंकिताचा आरोप
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. सुशांतच्या कुटुंबाकडून पाटण्यामध्ये त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या नावे गुन्हा नोंदवण्यात आला. ज्यानंतर हालचालींना वेग आला आणि बिहार पोलिसांनी थेट मुंबई गाठली. या साऱ्या प्रकरणामध्ये अभिनेत्री आणि सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अर्थात त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिचंही नाव पुढं येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
रियाची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावपळ, अंकिताचं सूचक ट्विट
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं महिन्याभरापूर्वी मुंबईतील त्याच्या राहच्या घरी आत्महत्या केली. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर अनेक अनुत्तरित प्रश्नांनी डोकं वर काढलं. ज्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी काही मोठ्या सेलिब्रिटींची चौकशीही केली. त्यातच आता सुशांतच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआरयार दाखल केली आहे. ज्यामुळं तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल
सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहरची याच आठवड्यात चौकशी होणार
सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे काल अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी
सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे काल अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
करण जोहर आणि आदित्य ठाकरे चांगले मित्र, त्यामुळे अजून चौकशी झाली नाही - कंगना रानौत
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
थिएटर मालकांकडून केंद्र सरकारकडे नियमावली सादर, अनलॉक ३ मध्ये चित्रपटगृहांना सूट मिळणार?
देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा कळस गाठत आहे. गेल्या २४ तासांत 48,916 नव्या रुग्णांची भर पडली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या २४ तासांत ७५७ रुग्णांचे निधन झाले आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 13,36,861 वर पोहोचला आहे. यामध्ये 4,56,071 एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 8,49,431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, देशभरात 31,358 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह ही फेक न्युज
महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची बातमी काही वेळापूर्वी वेगाने पसरली होती. मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे.सध्या अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयामध्ये आहेत. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांवर असे सांगण्यात येत होते की त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, दरम्याने हे वृत्त खोटे असल्याचे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रिया बेर्डे यांच्यानंतर अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार
काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि निर्मात्या प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा हाती घेणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर लवकरत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सध्या त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिसांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल चार तासांच्या या प्रक्रियेनंतर ते पोलीस स्थानकाबाहेर आले.
5 वर्षांपूर्वी -
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी आराध्या कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या घेण्यात आला. या चाचण्यांचा अहवाल आला असून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्याची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. सुदैवाने जया बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, पण त्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. खुद्द अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समजते आहे. दरम्यान, अभिनेत्री जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन हिची रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB