महत्वाच्या बातम्या
-
सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील वादाशी मनसेचा संबंध नाही - राज ठाकरे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग आला आहे. पोलिसांकडून होणाऱ्या सतत विचारपूस व चौकशीच्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिथानीने बुधवारी वांद्रे पोलिस स्टेशन गाठले होते. सिद्धार्थ पिथानी सुशांतबरोबर त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. अलीकडेच अभिनेत्री संजना सांघी यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. संजनाने सुशांतच्या ‘दिल बेचार’ या शेवटच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या प्रकरणात, YRF कास्टिंग डायरेक्टर आणि जलेबी स्टार अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह सर्वांची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेतू App चा ब्रँड अँबेसिडर अजय देवगण भारत-चीन संघर्षावर फिल्म निर्मिती करणार
लडाखमधील गलवान खोऱ्या भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. या झटापटीत शहीद झालेल्या भारताच्या 20 सैनिकांची शौर्यगाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण हा चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षण आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे मुंबईत निधन
बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर सरोज खान यांना २० जून रोजी वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल केले होते. आज सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच त्यांची कोविड-१९ची चाचणीही घेतली होती. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, मालाड येथील मिठी चौकी कब्रिस्तानमध्ये सरोज खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
5 वर्षांपूर्वी -
आमिर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, संपर्कातील लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या घरामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्याच्या संपर्कातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली असून याबाबतची माहिती स्वतः आमिरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच सगळे क्वारंटाईन झाले असून आमिर त्याच्या आईसह स्वतःचीही कोरोना चाचणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतचं सोशल मिडिया अकाऊंट दुसरं कोणतरी हाताळतंय? अनेक शंका उपस्थित
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचं कोडं अदयाप उलगडलेलं नाही. ही आत्महत्या नैराश्यामुळे नव्हे तर अन्य कारणामुळे झाली असल्याचा दावा अनेक चाहत्यांकडून केला जात आहे. तर काहीजण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं देखील बोलत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप नेत्या रूपा गांगुली यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत खळबळजक आरोप केले आहेत. सुशांतचं सोशल मिडिया अकाऊंट इतर कोणीतरी हाताळत असल्याचा आरोप रूपा यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एका माध्यमाने दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जेव्हा दिग्गज करोडपती कलाकारांना पेट्रोलचे भाव परवडत नव्हते...ते PR मॅनेजमेंट
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशात आज सलग विसाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज डिझले 17 पैशांनी, तर पेट्रोल 21 पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपये झाले असून डिझेलचे दर प्रति लिटर ८०.१९ रुपये झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची प्रथमच समाज माध्यमांवर प्रतिक्रिया
सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नेपोटीझ्मवर जोरदार चर्चा रंगतेय. सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर, करिना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान यांच्यावर चहुबाजुनी टीका होतेयं. या सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरील फॉलोअर्स कमी झालेयत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरुन त्यांना ट्रोल केलं जातंय. ट्वीटरवर देखील सुशांत सिंह राजपूत नाव ट्रेंड होतंय. या पार्श्वभुमीवर सलमान खान पहिल्यांदाच बोललाय. सुशांतच्या फॅन्सना सपोर्ट करण्याचे आवाहन त्याने आपल्या फॅन्सना केलंय.
5 वर्षांपूर्वी -
मजुरांवरील संकटाला स्वतःसाठी संधी बनवू नका, विशाल ददलानीचा पंतप्रधांना टोला
ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी या योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.
5 वर्षांपूर्वी -
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
मोठ्या पडद्यावर महेंद्रसिंग धोणीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं सुरू ठेवल्यास विनाशकारी परिणाम भोगावे लागतील
केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी २ आठवड्यांसाठी वाढवला असून तो १७ मेपर्यंत करण्यात आला आहे. यासाठी सरकारने काही नवीन नियमावली तयार केली आहे. यामध्ये दारूविक्रिला काही प्रमाणात परवानगी देण्यात आली आहे. रेज झोन आणि ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं आणि पानाची दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनच्या आणि हॉटस्पॉटच्या बाहेर असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
काय बोलाव? काय लिहाव काहीच समजत नाही म्हणत; लतादीदींकडून आठवण शेअर
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर मुलगी रिद्धिमा कपूर असा परिवार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही दुख:द बातमी जाहीर केली होती.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर मुलगी रिद्धिमा कपूर असा परिवार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही दुख:द बातमी जाहीर केली.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन..तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न बघा आणि आम्हाला रामायण बघायला सांगा
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काल म्हणजे शनिवारी, २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: पडद्यामागील सहकाऱ्यांना प्रशांत दामलेंकडून आर्थिक मदतीचा हात
कोरोनाच्या वादळात यावेळी नाट्यनिर्मात्यांचं आणि पर्यायाने संपूर्ण नाट्यसृष्टीचं झालं आहे. करोना विषाणूमुळे झालेलं हे नुकसान भरून निघणं कठीण आहे. नाटकाच्या बाबतीत काही तंत्रज्ञ किंवा बॅकस्टेजच्या कलाकारांचे कुटुंब हे प्रत्येक प्रयोगातून मिळणाऱ्या पैशांवर चालते. आता प्रयोगच बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी अभिनेते व निर्माते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
निलेश साबळे, भाऊ आणि कुशल विरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसात तक्रार
‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश साबळे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोलापुरात ‘संभाजी ब्रिगेड’च्या वतीने पोलिसात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'चला हवा येऊ द्या' वादात, संभाजीराजेंचा मालिका कलाकारांना इशारा
छोट्या पडद्यावरील विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला असून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा मुळ फोटो फोटोशॉप करण्यात आला असून त्याला विनोदी अंगाने दाखवण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार, निर्माते आणि झी वाहिनी विरोधात संताप व्यक्त केला जात असून झालेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणी होत आहे. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही याची दखल घेत ‘माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू’, असा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
....अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं - जितेंद्र जोशी
सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सहज व्यक्त होण्यासाठी सर्रास वापरलं जाणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे. मात्र त्याचसोबत ट्रोलिंगचंही प्रमाण खूप वाढलं आहे. या ट्रोलिंगवर अभिनेता जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे. एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं, असं त्याने म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
मी ब्राम्हण नाहीए बरं! CKP आहे..पण काम आहे माझ्याकडे
मराठीतील मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत ब्राह्मण मुली दिसतात, असं वक्तव्य‘केसरी’चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेने एका मुलाखतीमध्ये केलं होतं. यानंतर या प्रकरणी विविध क्षेत्रातून संमिक्ष प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाद्वारे तेजश्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठी कलाकार व्यक्त झाले किंवा नाही झाले तरी ट्रोलिंग; सोनाली ट्वीटरकरांवर संतापली
सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला होता. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो