महत्वाच्या बातम्या
-
....अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं - जितेंद्र जोशी
सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सहज व्यक्त होण्यासाठी सर्रास वापरलं जाणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे. मात्र त्याचसोबत ट्रोलिंगचंही प्रमाण खूप वाढलं आहे. या ट्रोलिंगवर अभिनेता जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे. एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं, असं त्याने म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
मी ब्राम्हण नाहीए बरं! CKP आहे..पण काम आहे माझ्याकडे
मराठीतील मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत ब्राह्मण मुली दिसतात, असं वक्तव्य‘केसरी’चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेने एका मुलाखतीमध्ये केलं होतं. यानंतर या प्रकरणी विविध क्षेत्रातून संमिक्ष प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाद्वारे तेजश्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठी कलाकार व्यक्त झाले किंवा नाही झाले तरी ट्रोलिंग; सोनाली ट्वीटरकरांवर संतापली
सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला होता. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
प्रसिद्धीनंतरच्या वागणुकीचा परिणाम; रानू मंडलवर पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ?
पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गात स्वतःचं पोट भरणाऱ्या सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या होती. बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानं त्या त्याच्या हॅप्पी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली आणि त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
5 वर्षांपूर्वी -
धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून आणि मराठीला नख लावलं तर; उलट्या चष्म्याचा सरळ व्हिडिओ
सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती. तत्पूर्वी मनसेने महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण करता कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मनसेने आता मराठीचा मुद्दा सोडला का अशी चर्चा रंगली होती. परंतु सध्याच्या घटनेने राज ठाकरे यांच्या भाषांतील ‘आमच्या धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून आणि मराठीला नख लावलं तर मराठी म्हणून अंगावर घेईन’ असं म्हटलं होतं, जे ताज्या घटनेतुन आठवण करून देताना दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या अभिनेत्रीवर मंत्रालयात भीक मागण्याची वेळ; २०१८'मध्ये सामना'त बाता मारल्या होत्या: सविस्तर
१९८५ साली प्रदर्शीत झालेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट मराठीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आजही या चित्रपटातील गाणी व डायलॉग्स प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटात झळकलेले अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, प्रेमा किरण असे सर्वच कलाकार आज मराठीतील नामवंत कलाकार म्हणून ओळखले जातात. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. परंतु आज ती अभिनेत्री ओळखताही येणार अशा अवस्थेत हलाखीचे जीवन व्यतीत करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे आणि पुढे काय दाखवायचे आणि काय नाही ते ?
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. तसंच आपली मागणी मान्य केल्याचा दावाही खोतकर यांनी केला त्यावर राष्ट्रवादीचे खासदार आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं कोणतंही आश्वासन मी दिलेले नाही. शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO- पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात तेजश्री प्रधानचा हा 'बोल्ड सिन' पाहिलात?
मालिका, नाटक आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनयाची दमदार छाप उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान बॉलिवड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘बबलू बॅचलर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
#फोटो: मराठी चित्रपट श्रुष्टीतील सौंदर्यवती म्हणजे वैदेही परशुरामी; एकदा फोटो बघाच
मराठी चित्रपट श्रुष्टीतील एक सुंदर चेहरा म्हणजे वैदेही परशुरामी. ‘सिम्बा’ चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण, एक मराठी मुलीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. ही मुलगी आहे मुंबईची वैदेही परशुरामी. ‘सिम्बा’मध्ये वैदेही नायिकेच्या भूमिकेत असलेल्या सारा अली खान हिच्यावरही भारी पडली आहे. वैदेहीनं मुंबईमधून एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्य वकील आहेत. आई, बाबा आणि भाऊ हे तिघे ही वकिली व्यवसायात आहेत. चला पाहूयात या मराठमोळ्या अभिनेत्रीचे काही खास फोटो.
5 वर्षांपूर्वी -
तान्हाजी: सूर्याजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो
अजय देवगण- काजोल आणि सैफ अली खान स्टारर तान्हाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार केला. फक्त ६ दिवसांमध्ये अजय- सैफच्या या सिनेमाने १०७.६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षातला १०० कोटी रुपयांचा आकडा पार करणारा तान्हाजी हा पहिला सिनेमा ठरला आहे. वीकडेमध्ये सिनेमा ज्याप्रकारे कमाई करत आहे, यावरून सिनेमाच्या कथेत किती ताकद आहे ते दिसतं. सिनेमा लवकरच १५० कोटींची कमाईही करेल.’ दरम्यान महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झालं आणि तसा निर्णय घोषित करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
फिल्मी देशभक्त! अनेकांकडून छपाक'चं बुकिंग कॅन्सल...पण तिकीट सर्वांचं सारखंच
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणवर जोरदार टीका सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी दीपिकानं जेएनयूच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. यानंतर दीपिका तुकडे-तुकडे गँगची सदस्य असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील नेत्यांकडून करण्यात आली. त्यासाठी दीपिकाच्या आगामी छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन समाज माध्यमांवरून करण्यात आलं. त्यासाठी #boycottchhapaak वापरण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
संपूर्ण देश घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांसोबत आणि प्रवीण तरडेंनी सर्वांना जबरदस्ती भाजपसोबत जोडलं
जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना हल्ला केला होता. त्यामुळे, देशभरात विद्यार्थी संघटनांनी एकत्र त्याचा निषेध नोंदवत आंदोलन केलं. या आंदोलनात अनेक सिनेकलाकार सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वांनीच या घटनेचा निषेध नोंदवला. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही जेएनयुतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. देशभरात जेएनयुचा मुद्दा गाजत असताना, प्रविण तरडेंनी एका फेसबुक पोस्टवर कमेंट करताना, संपूर्ण देश भाजपासोबत आहे, असे म्हटले. त्यामुळे, नेटीझन्सने तरडेंना ट्रोल केलंय.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीची सोनी टीव्हीच्या कार्यालयावर निदर्शनं; सोनी टीव्हीचा माफीनामा
अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला आहे. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
6 वर्षांपूर्वी -
सोनी टीव्ही वाहिनीने खोडसाळपणे केलं आणि बोल बच्चन यांनी अक्कल गहाण ठेवली होती
अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला आहे. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - 'पानिपत'! मराठयांची ऐतिहासिक आठवण; ऍक्शन सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत हे ऐतिहासिक स्थळ…’हर हर महादेव’चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज…. मराठ्यांचा इतिहास भव्य – दिव्य रूपात पडद्यावर मांडणाऱ्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
आम्ही युतीला मतं दिली; आता भांडून हे आम्हाला मूर्ख बनवत आहेत: अशोक पंडित
महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन्ही राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल याबद्दल देशात बरीच चर्चा रंगली आहे. एकीकडे हरियाणामध्ये कॉंग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला २८८ जागांपैकी १६१ जागा मिळाल्या आहेत. मात्र, या विजयानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या पदा संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये बरीच भांडणं लागल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल आता बॉलिवूड निर्माता अशोक पंडित यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'हिरकणी'ला थिएटर द्या, एक विनंती करणार, अन्यथा 'खळखट्याक'ला तयार राहा
एकीकडे लेकरासाठी बुरुज उतरुन आलेली ‘हिरकणी’ आणि दुसरीकडे तिच्या आयुष्यावर आधारित ‘हिरकणी’ हा चित्रपट. हिरकणीप्रमाणेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाटही अवघड झालेली दिसत आहे. बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ‘हाऊसफुल ४’ मुळे ‘हिरकणी’ला चित्रपटगृह मिळण्यात अडथळे उभे राहत आहेत. त्यामुळे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने पुन्हा खळ्ळखट्यॅकचा इशारा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन
‘शोले’ चित्रपटातील ‘कालिया’ ही व्यक्तीरेखा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गायदेवी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर ठरलेल्या शोले चित्रपटातील ‘सरदार, मैंने आपका नमक खाया है’; या संवादामुळे विजू खोटे यांना वेगळी ओळख मिळाली होती.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: स्टेशनवर गाणं गाणाऱ्या त्या महिलेला मिळाली एका रात्रीत प्रसिद्धी; आयुष्यच बदललं
सोशल मीडिया मुले कित्येक जण एका रात्रीत स्टार होतात. यातच आता भर पडली आहे ती म्हणजे राणू मंडलची. काही दिवसांपूर्वी बंगालमधील एका स्टेशनवर लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गाणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कित्येक लोकांचा प्रतिसाद या व्हिडीओ ला मिळाला.
6 वर्षांपूर्वी -
भोंगा या मराठी चित्रपटाला राट्रीय पुरस्कार जाहीर.
नवी दिल्लीत ६६ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आले. त्यात भोंगा या चित्रपटाला सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नलिनी प्रोडक्शन प्रदर्शित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित या चित्रपटात कामगारांच्या आयुष्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्यावर येणाऱ्या अडचणी संकट याला तो कामगार कसा समोरा जातो.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN