महत्वाच्या बातम्या
-
अखेर अक्षय'ची माघार; ’मिशन मंगल’ मराठीत डब न करण्यावरून होता वाद
अभिनेता अक्षय कुमारने त्याचा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्हमधून त्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतल्याचे जाहीर केले.
5 वर्षांपूर्वी -
संजय दत्त यांच्या बाबा चित्रपटाची गोल्डन ग्लोब मध्ये निवड.
संजय दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेला बाबा हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात मूक बधिर जोडप्याची व त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाची शंकरची कथा मांडण्यात आली आहे. अचानक शहरातील एक दाम्पत्य शंकरवर त्यांचा हक्क सांगते. तीखूनच पुढे शंकरच्या आई वडिलांचा लढा सुरु होतो. आपल्या मुलाला मिळवण्यासाठी बाबानी केलेला संघर्ष चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फोर्ब्स इंडिया: दीपिका पदुकोण ठरली जगातली सुंदर महिला
फोर्ब्स इंडियाने नुकतीच १०० ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीमध्ये पहिल्या ५ अभिनेत्रींनमध्ये दीपिकाने स्थान मिळवले आहे. दीपिका पदुकोण हि बॉलिवुडमधल्या महागड्या अभिनेत्रीनपैकी एक आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिचे सौंदर्य सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. दीपिकाने वर्ल्ड मोस्ट गॉरजियास वुमन २०१९ हा किताब आपल्या नावावर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार'ला एका महिलेने पाठविले अश्लील मेसेज
झी मराठी वाहिनी वरील तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांच्या अगदीच पसंतीस पडली. त्याचप्रमाणे मालिकेतील अभिनेत्री गायत्री दातार हिने थोड्याच कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच ह्या मालिकेचा शेवट झाला असून विक्रांत आणि ईशाची प्रेमकहाणी सगळ्यांनाच भावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO : ‘ये रे ये रे पैसा 2’चा धमाकेदार ट्रेलर लाँच!
लंडनमध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद… हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर आगामी मराठी चित्रपट ‘ये रे ये रे पैसा २’मधील आहे.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूडच्या 'बाबा'चे वयाच्या ६०व्या वर्षात पदार्पण
संजय दत्त म्हणजेच बॉलिवूडचे संजू बाबा आज ६० वर्षाचे झाले. अभिनेते सुनील दत्त व नर्गिस दत्त यांच्या पोटी संजय दत्त यांचा जन्म २९ जुलै १९५९ रोजी झाला. बॉलिवूड मध्ये संजय दत्त यांचं पदार्पण १९८१ मध्ये रॉकी ह्या चित्रपटातून झाले. संजय दत्त यांनी आपल्या पदार्पणानंतर अनेक हिट सिनेमे केले. १९८५ मधील नाम, १९८८ मधील जीते हैं शान से, मर्दो वाली बात, १९८९ मधील इलाका, हम भी इन्सान है आणि कानून अपना अपना असे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे त्यांनी त्या काळी प्रेक्षकांसाठी केले.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - लालबत्ती : वर्दीच्या मागचा खरा माणूस
२६ जुलै २०१९ रोजी कारगिल दिवसाच्या निमित्तावर रिलिझ झालेल्या लालबत्ती ह्या मराठी चित्रपट द्वारे मंगेश देसाई आणि मनोज जोशी असे दिग्गज अभिनेते मराठी पडद्यावर पुन्हा झळकले. गिरीश मोहिते दिग्दर्शित व संतोष सोनावडेकर निर्मित लालबत्ती ह्या चित्रपटात पोलिसांच्या आयुष्यात घडणाऱ्या दर रोजच्या घडामोडी व त्यांची अडीअडचणी अतिशय सुंदर रित्या दाखवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमृता खानविलकर व अक्षय बर्दापूरकर सुरु करणार 'प्लॅन-टी' कंपनी
कित्येकदा अनेकांमध्ये अशा कला आणि प्रतिभा असतात ज्या प्रेक्षकांसमोर येणे किंवा त्यांना योग्य असा प्लॅटफॉर्म मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठीच अक्षय बर्दापूरकर आणि अमृता खानविलकर ‘प्लॅन टी’ नावाची कंपनी सुरु करणार आहेत. हि कंपनी महाराष्ट्रातल्या छुप्या प्रतिभेला (टॅलेंटला) बाहेर आणण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रात असे किती तरी तरुण आहेत ज्यांच्याकडे अभिनय, लेखन, दिग्दर्शन, अशा कला आहेत, परंतु त्यांच्याकडे एक भक्कम असा प्लॅटफॉर्म नाहीये.
5 वर्षांपूर्वी -
बिग बॉस मराठी २ : आला रे आला 'अभिजीत बिचुकले' आला; आज बिग बॉसमध्ये परतणार
बिग बॉस मराठीच्या घरातून काल माधव देवचके बाहेर पडला. त्याला दिलेल्या विशेष अधिकाराने त्याने नेहाला पुढील आठवड्यासाठी सेफ केले. माधवच्या जाण्याने नेहा आणि शिवानीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जाण्याने आता नेहा आणि शिवानीची काय योजना असेल? याकडे सर्वांचे लक्ष आहेच. मात्र ज्या क्षणाची प्रेक्षक वाट बघत होते तो क्षण आज पाहायला मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासदार संजय राऊत आणखी तीन चित्रपटांची घोषणा करणार
भारतीय राजकारणाच्या इतिहासात ठसा उमटवणार नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या जीवनावरील ठाकरे या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर संजय राऊत आता पुन्हा चित्रपट सृष्टीत पॉल टाकणार आहेत. राजकारणी ते चित्रपट निर्माते असा प्रवास करणारे संसद सदस्य संजय राऊत आपल्या आगामी तीन चित्रपट प्रकल्पाची घोषणा करण्यास सज्ज झाले आहेत. ठाकरे हा चित्रपट राऊटर्स एंटरटेनमेंटचे संजय राऊत लिखित, संकल्पित आणि निर्मित पहिला चित्रपट आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - फिल्मी तडका! वारे 'सेक्रेड गेम्स २' चे...
गेल्या वर्षी जुलै महिन्यात नेटफ्लिक्स वर एक वेब सिरीज सुरु झाली आणि त्या सिरीजने वेब चाहत्यांना वेड लावलं. ती वेब सिरीज म्हणजे सेक्रेड गेम्स. नवाजउद्दीन सिद्दीकी ह्या नावाजलेल्या अभिनात्यांनी साकारलेलं गायतोंडे हे पात्र व त्यासह अनेक पात्रांनी तरुणांमध्ये तसेच सोशल मिडियावर धुमाकूळ घातला. वेब सिरीज संपूनही किती तरी दिवस सेक्रेड गेम्स मधले काही सिन्स सोशल मिडियावर मिम्सच्या रुपात सोशल मिडियावर येत होते. ते काही महिन्यांपूर्वी थांबले असतानाच, आता नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वीच सेक्रेड गेम्स २ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे व तो सोशल मिडियावर व्हायरल देखील झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनोरंजनाची शिदोरी घेऊन आलाय नवा चित्रपट 'गर्लफ्रेंड'
एखादा चित्रपट आला कि तो परिवारासोबत पाहायचा कि नाही असा प्रश्न नेहमीच सर्वाना पडतो. कारण हल्ली पारिवारिक चित्रपट फार कमी पाहायला मिळतात. बऱ्याच दिवसांनी मराठीत एक असा चित्रपट आलाय जो तुम्ही मित्रमंडळी किंवा कुटुंबासोबत पाहू शकता. उपेंद्र सिधये लिखित आणि दिग्दर्शित ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट सर्वानाच आपलासा वाटेल असा आहे.
5 वर्षांपूर्वी -
Video: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? नक्की पहा
Video: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? नक्की पहा
6 वर्षांपूर्वी -
मैत्री करताना आपण लिंगाचा विचार करत नाही: दिशा पटानी
बॉलिवूडमधील कलाकरांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकंच त्यांना समाज माध्यमांवरील ट्रोलिंगला देखील मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागतं. नुकतंच अभिनेत्री दिशा पटानीला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. दरम्यान या गोष्टीमुळे दिशाला समाज माध्यमांवर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः बॉलिवूड कलाकार टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकाऱ्यांनी केल्या आणि दिशा पटानीला हैराण करून सोडले होते. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने देखील प्रतिउत्तर दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड कालवश
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं सोमवारी सकाळी बंगळुरू येथील त्यांंच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे कलाविश्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. १९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला होता. मराठी, हिंदी आणि कन्नड भाषांवर त्यांचे प्रभत्व होते. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे त्यांचं मूळ गाव. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पार पडलं.
6 वर्षांपूर्वी -
'PM नरेंद्र मोदी' सिनेमाकडे भक्तांसहित प्रेक्षकांची पाठ; कार्टून सिनेमाची कमाई पण अधिक
भारताच्या राजकीय इतिहासात बहुमताने निवडून येणारे मोदींना त्याच्या जीवनपटावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अल्पमतात देखील हजेरी लावताना दिसत नाही. देशाची सत्ता पुन्हा एकदा मिळवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाकडं सिनेरसिकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटानं केवळ २.२५ ते २.५० कोटींची कमाई केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
एक्झिट पोलनंतर विवेक'बुद्धी' हरवली; फ्लॉप कलाकार विवेक ओबेरॉयच वादग्रस्त ट्विट
बॉलीवूडमध्ये सध्या संधी नसलेले अनेक कलाकार भाजप प्रेमी झाले आहेत. त्यानंतर त्यांचे वादग्रस्त प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. तसाच काहीसा प्रकार अभिनेता विवेक ओबेरॉय याने एक्झिट पोलवरून रंगलेल्या चर्चेवरून केला आहे. वास्तविक एक्झिट पोलबाबत काही मत व्यक्त करण्यास काहीस हरकत नव्हती. मात्र सध्या विवाहित असलेल्या ऐश्वर्या राय संदर्भात समाज माध्यमांवरील फिरणाऱ्या विचित्र गोष्टी शेअर करून त्याचा संदर्भ सध्याच्या एक्झिट पोलशी जोडणे म्हणजे निव्वळ स्वतःची विवेक’बुद्धी’ हरवल्याची प्रकार आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
सेल्फ डिफेन्सचे धडे घेताघेता शिवसेनाच अक्षयच्या डिफेन्समध्ये, त्याची कॅनडीयन नागरिकत्व तांत्रिक बाब
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर भाष्य करतानाच अभिनेता अक्षय कुमारचे नागरिकत्वाच्या मुद्दावरुनही समर्थन केले आहे. अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे.
6 वर्षांपूर्वी -
हाफीज सईद तर संत वाटत असेल तुम्हाला? स्वरा भास्कर
भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. भोपाळमध्ये मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा असा थेट सामना रंगणार आहे. परंतु मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी यांना उमेदवारी दिल्याबद्दल अनेकांकडून टीका होत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वरा भास्करनेही उडी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दणका! कार्यक्रमांमधून विशिष्ट पक्षाच्या स्कीम्स प्रमोट केल्याने झी वाहिनीवर कारवाई
मागील काही दिवसांपासून झी वाहिनीवर आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत मालिकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पॉलिटीकल पार्टीच्या स्कीम्स प्रमोट करण्यात येत होत्या. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आपला आक्षेप नोंदवत कडक कारवाई केली आहे. आचार संहिता लागु असताना अशा प्रकारे प्रचार करणे झी वाहिनीला महागात पडले आहे. त्यामुळे आज झी वाहिनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण रात्री ८ ते १० यावेळेत बंद करण्यात आले होते. झी वाहिनीने प्रचार केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो