महत्वाच्या बातम्या
-
मराठी सिनेमे ‘नशिबवान’ नाहीत; भाऊ कदमची पोस्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची गळचेपी झाल्याचं उदाहरण समोर आलं आहे. विशेष करून हिंदी भाषिक सिनेमांमुळे मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी रोजचीच झाली आहे .कारण ‘आणि…डॉ काशिनाथ घाणेकर’, भाई, लव्ह यू जिंदगी या चित्रपटानंतर आता भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला ‘नशिबवान’ या चित्रपटाला शो मिळणे सुद्धा फार कठीण झाले आहे. त्यामुळे भाऊने कदमने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्वतःच्या भावना आणि चीड व्यक्त केली आहे. ‘नशिबवान’ हा चित्रपट मागील शुक्रवारी म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप, रेल्वे प्रवास आणि उद्धव ठाकरे; व्हॉटसअॅप-एफबी'वरील तो फेक व्हायरल-चेक
सध्या सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होऊन जगभर पसरेल ते काहीच सांगता येणार नाही. मागील जवळपास ७ दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्टचा संप सुरु असून सामान्यांसाठी मेट्रो आणि ट्रेन हीच परवडणारी प्रवासाची माध्यमं उरली आहेत. परंतु, सध्या याच संपाचा धागा पकडून रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका नेटकाऱ्याने रेल्वेतील प्रवाशाचा फोटो काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
१५३ रुपयांत १०० टीव्ही चॅनेल दाखवाः दूरसंचार नियामक प्राधिकरण
TV वरील आवडीचे चॅनेल निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ ने ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेवून ट्रायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल दाखवण्याचे थेट निर्देश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच’सेवा देणाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्राहकांनी TV वरील १०० चॅनेलची निवड ३१ जानेवारीपर्यंत करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संप: राऊतांना संगीत व संप यातला फरक कळतो का? 'बेस्ट'च्या संपावर संगीतमय 'चेष्टा'
मागील ५ दिवसांपासून बेस्टचा संप सुरु असून, त्यामुळे बेस्टचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य मुंबईकर असे सर्वच हैराण झाले असताना शिवसेनेचे आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून संताप जनक प्रतिक्रिया आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सालाबादाप्रमाणे आयोजित होणारा अंधेरी फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला
अंधेरी पूर्व येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची पर्वणी असणारा भव्य अंधेरी फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या फेस्टिवलचे दरवर्षी मुंबई अंधेरी पूर्व येथे भव्य आयोजन करण्यात येते. जीवन ज्योत प्रतिष्ठानचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल त्यांच्या पत्नी व नगरसेविका केसरबेन पटेल यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी या फेस्टिवलचे भव्य आयोजन करण्यात येते.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन
मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर प्रधान यांचे आज वयाच्या ८३ व्हा वर्षी निधन झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
#MeToo स्टंट? आलोकनाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्यात आलं असावं: न्यायालय
विनता नंदा यांनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी बॉलीवूड अभिनेते आलोक नाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवल्याची शक्यता नाकारत येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी दरम्यान व्यक्त केले. दिग्दर्शक आणि निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथांवर काही महिन्यांपूर्वी #MeToo मोहिमेअंतर्गत बलात्काराचा आरोप केला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध FIR सुद्धा दाखल केला होता.
6 वर्षांपूर्वी -
‘हे तर दहशतवादीच’; स्वरा भास्करची आरएसएस'वर टीका
शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून केरळमध्ये कायदा सुव्यवस्थेवरून तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने-आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांना सर्वात मोठं हिंसक वळण मिळाले ते केरळमधल्या नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर ४ गावठी बॉम्ब फेकण्यात आले. धक्कादायक म्हणजे संबंधित पोलिस ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकणारे संशयित हे आरएसएसशी संबंधित असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पद्म पुरस्कार: फिल्मी भाजप, श्रीदेवी, रमाकांत आचरेकर सर व राज यांनी मांडलेलं ते वास्तव आज सिद्ध झाले
भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे आणि जो भविष्यात भारतरत्न झाला, अशा महान सचिन तेंडुलकरचे गुरु आणि पद्म पुरस्कार विजेते द्रोणाचार्य रमांकात आचरेकर सर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक महान क्रिकेटपटू, जाणकार आणि राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले गुरु आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, यावेळी सचिन आणि सरांचे सर्वच शिष्य अत्यंत भावुक झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज लोकसभेच्या रिंगणात
मोदी सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे भाष्य करणारे अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यांनी नववर्षाच्या सुरूवातीला आपण २०१९ ची लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचं अधिकृत ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी कोणत्याही पक्षाची निवड केली नसून ते थेट अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते कादर खान यांचे निधन
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि लेखक कादर खान यांचे काल ३१ डिसेंबरला प्रदीर्घ आजाराने आणि वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले आहे. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे. सरफराज याने प्रसार माध्यमांना कळविले की, माझ्या वडिलांनी काल ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता ( कॅनडाच्या प्रमाणवेळेनुसार) अंतिम श्वास घेतला. त्याआधी दुपारी ते कोमात गेले होते आणि अखेर संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मागील १६ ते १७ आठवड्यांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. त्यानिमित्त त्यांचे संपूर्ण कुटुंब कॅनडात त्यांच्या सोबत होते. त्यामुळेच त्यांच्या पार्थिवावर अखेर कॅनडातचं अंत्यसंस्कार होतील असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा अति उतावळेपणा प्रेक्षकांना ‘ठाकरे’ चित्रपटापासून दूर लोटेल?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. परंतु, २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांमुळे प्रेक्षकांना दूर लोटण्याची शक्यता आहे. कारण बाळा लोकरे यांनी पोस्ट टाकली आहे की २५ जानेवारीला ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्या दिवशी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा नेमका प्रजासत्ताकदिनाच्या आदल्याच दिवशी प्रेक्षकांना मिळणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर लाँच
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर आज उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉंच करण्यात आला. वडाळ्यातील आयनॉक्स थिएटरमध्ये हा ट्रेलर लाँच करण्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटातील ट्रेलरमध्ये दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांची सुद्धा व्यक्तीरेखा दिसल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, पण देसींगर्लच्या रिसेप्शनला मोदींची हजेरी
प्रसिद्ध बॉलिवूडची अभिनेत्री आणि ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनास २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्याआधी ते शनिवारी, १ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यानंतर पुन्हा रविवारी २ डिसेंबरला पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला होता. दरम्यान काल मंगळवारी दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये प्रियांका-निकचं ग्रँड रिसेप्शन पार पडलं.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ युपी २०१६; रामलीला'मध्ये नवाजुद्दीन मुस्लिम असल्याने शिवसेनेने विरोध केलेला, आज?
सध्या शिवसेनेने अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण सुरु केलं असलं तरी त्यांचा खरा मुखवटा अनेक विषयांवरून समोर येताना दिसत आहे. शिवसेना नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करते असे सांगत असताना, दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करते असे भाषणात नेहमीच कानावर पडते. शिवसेना केवळ पाकिस्तान आणि बांगलादेश धार्जिण्या मुस्लिमांच्या विरोधात आहे, असं ठासून सांगत असते. परंतु, उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर यथे २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रामलीला’मध्ये मारीच’ची भूमिका करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीला शिवसेनेने केवळ तो मुस्लिम असल्याने रामलीला’मध्ये भूमिका करण्यास तीव्र विरोध केला होता.
6 वर्षांपूर्वी -
गुरु ग्रंथ साहिब अवमान; अक्षय कुमारची पंजाब एसआयटीकडून चौकशी
शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब राज्य एसआयटीकडून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची आज तब्बल २ तास प्रश्नांचा भडीमार करत कसून चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाब राज्य एसआयटीने अक्षय कुमारला चौकशीदरम्यान तब्बल ४२ प्रश्न विचारल्याची माहिती आहे. परंतु, अक्षय कुमारने पोलिसांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइमटाइम द्या.....अन्यथा!, मनसे मैदानात
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या दिमाखात प्रदर्शित झालेल्या “आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर”या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात सलग सुट्ट्यांमुळे ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपटट पाहण्यासाठी कल्याणमधील सिनेमॅक्स येथे गेलेल्या प्रेक्षकांचा पूर्ण हिरमोड झाला आहे. दरम्यान, उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या या चित्रपटाला कल्याणमधील सिनेमॅक्समध्ये दिवसभरात केवळ एकच शो देण्यात आला आहे. आणि तो सुद्धा भर दुपारी ३ वाजताचा. परंतु, प्रेक्षकांचा पूर्ण भ्रमनिरास करणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे सिनेमॅक्समध्ये शो जास्त ठेवण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा अप्रतिम ट्रेलर लॉन्च, नक्की पहा
2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा अप्रतिम ट्रेलर लॉन्च, नक्की पहा
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचे दीर्घ आजाराने निधन
मराठी संगीत जगतावर अनेक वर्ष आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज इस्पितळात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आज सायंकाळीच चार वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानात भारतीय चित्रपट व मालिकांवर कायदेशीर बंदी
पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणाऱ्या भारतीय समर्थकांना आज चांगलाच धडा मिळाला आहे. कारण पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने शनिवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारतीय चित्रपट आणि मालिकांवर बंदीचा घालण्याचे आदेश दिले आहेत. याआधी २०१७ मध्ये लाहोर हायकोर्टाने भारतीय मालिका आणि चित्रपटांवरील बंदी हटवली होती. परंतु, या आदेशामुळे बॉलिवूडला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो