महत्वाच्या बातम्या
-
2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा अप्रतिम ट्रेलर लॉन्च, नक्की पहा
2.0 Trailer Launch: सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चा अप्रतिम ट्रेलर लॉन्च, नक्की पहा
7 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचे दीर्घ आजाराने निधन
मराठी संगीत जगतावर अनेक वर्ष आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज इस्पितळात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आज सायंकाळीच चार वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानात भारतीय चित्रपट व मालिकांवर कायदेशीर बंदी
पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणाऱ्या भारतीय समर्थकांना आज चांगलाच धडा मिळाला आहे. कारण पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने शनिवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारतीय चित्रपट आणि मालिकांवर बंदीचा घालण्याचे आदेश दिले आहेत. याआधी २०१७ मध्ये लाहोर हायकोर्टाने भारतीय मालिका आणि चित्रपटांवरील बंदी हटवली होती. परंतु, या आदेशामुळे बॉलिवूडला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शास्त्रीय गायक राहुल देशपांडे लवकरच मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार
सिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीतकार राहुल देशपांडे लवकरच एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘अमलताश’ या नव्या मराठी चित्रपटात राहुल देशपांडे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. आगामी ‘मामी’ या चित्रपट महोत्सवाला ‘अमलताश’ या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे राहुल देशपांडे यांनी यापूर्वी बालगंधर्व, पुष्पक विमान या चित्रपटांसाठी सुद्धा काम केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo : उद्या तसे आरोप मोदींवर सुद्धा होतील : शक्ती कपूर
#MeToo मोहिमेवर सध्या देशभर वादंग निर्माण झालं असताना अभिनेते शक्ती कपूर यांनी वेगळीच शंका या मोहिमेवर उपस्थित केली आहे. त्यांच्या नुसार या प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली या केवळ ब्लॅकमेल करत असल्याची टीका तसेच शंका शक्ती कपूर यांनी व्यक्त केली आहे. उद्या असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा होतील अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अक्षय कुमारच्या त्या कृत्याचं काय? ते कोणत्या मोहिमेत मोडतं?
सध्या तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर संपूर्ण चित्रपट श्रुष्टि ढवळून निघाली असताना, नाना पाटेकरांवर १० वर्षांपूर्वीच्या गैरवर्तणुकीच्या आरोपांवर बोट ठेवत अक्षय कुमारने हाऊसफुल ४ मधून तूर्तास लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुद्धा आरोप झाल्याने पेच अजूनच वाढला आहे. त्यातील नाना पाटेकर यांच्यावरील आरोप सध्या न्यायालयात गेल्याने थोडं सबुरीने घेणं गरजेचं आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारने केलेली कृत्य स्वीकारावी अशी होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo : नाना पाटेकर व साजिद खानवर आरोप झाल्याने ‘हाऊसफुल ४’चे दरवाजे बंद?
अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे जाहीर आरोप झाल्याने त्यांच्यासोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही असा निर्णय बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार याने घेतला आहे. त्यामुळे आता #MeToo मोहिमेमुळे झालेल्या आरोप प्रत्यारोपाणानंतर फिल्मी दुनियेतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं देत सुटलो: नितीन गडकरी
आम्हाला २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्याची खात्री नसल्याने काही जणांनी मतदाराला आश्वासने द्यायला सांगितली. त्यानंतर आम्ही इतकी आश्वासने दिली लोकांना की ती आता आठवत सुद्धा नाहीत अशी कबुली खुद्द केंद्रीय दळणवळन मंत्री नितीन गडकरी यांनी मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमा दरम्यान दिली. परंतु, त्यांच्या या विधानाने भाजपच्या अडचणी वाढणार असून गडकरींच्या या कबुलीने भाजपची एक प्रकारे पोलखोल झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तनुश्री माध्यमांना चुकीची माहिती देत आहे: सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर
तनुश्री दत्ता पूर्णपणे चुकीची माहिती माध्यमांकडे पोहोचवत आहे आणि प्रसार माध्यमांनी सुद्धा तिच्या विधानांना प्रसिद्धी देताना विचार केला पाहिजे, असे ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर यांनी म्हटले आहे. २०० लोक सेटवर असताना “चॉकलेट” चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तनुश्रीला कपडे काढायला लावले असा आरोप करून तनुश्री चुकीची माहिती माध्यमांना देत आहे, असं सेटवर उपस्थित असणारे सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर यांनी स्पष्ट करून तनुश्रीला फटकारलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कायदेशीर नोटीसवर सुद्धा तनुश्रीला आक्षेप, एकूण भारतीय न्याय पद्धतीवरच तिचा आक्षेप सुरु?
भारतात तुम्ही छळ, अपमान तसेच अन्यायाविरोधात आवाज उठवल्यास तुम्हालाच नोटीस पाठवली जाते, असे तिने म्हटले आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपानंतर तिला नाना पाटेकर आणि ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. परंतु तनुश्रीने आता या नोटीसला कायदेशीर मार्गाने आणि सर्व आरोपांचे पुरावे सादर करण्याऐवजी भारतीय लोकतंत्र आणि कायदेशीर प्रक्रियेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ खुलासा! तो राजकीय पक्षाचा जमाव होता हे रेणुका शहाणेंना कोणी सांगितलं? सविस्तर वृत्त
समाज माध्यमांवरील अति उतावळेपणाचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. कोणाला समर्थन द्यावं आणि कोणाला देऊ नये हा ज्याचा त्याचा लोकशाहीतील अधिकार. परंतु लोकशाहीत स्वतःचे अधिकार समाज माध्यमांवर इतक्या अंध पणे सुशिक्षित लोकं गाजवतात की आपल्या हातून एखाद्याची पाठराखण करताना दुसऱ्या बाजूला आपण काय अफवा पसरवत आहोत याचं भान त्यांना होताना दिसत नाही अशी परिस्थिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
तनुश्रीच्या आडून दिल्लीश्वरांचा नाना पाटेकर आणि मनसे विरुद्ध सापळा? सविस्तर
झूम वहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर तनुश्रीने पुन्हा प्रसार माध्यमांसमोर नाना पाटेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ज्या भाषेत प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून तरी तिचे बोलविते धनी दुसरेच कोणी असून सर्व काही सिनेमाप्रमाणे स्किप्टेड (ठरवून) असल्याची कुजबुज प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. अगदी ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाचा वाद, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे असा कशाचा कशाला संदर्भहीन विषय तिच्या पत्रकार परिषदेत आला कसा अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या हातून निसटलेल्या पाणी फाऊंडेशन तसेच ‘अक्षय कुमार’ राजकारणाशी त्याचा थेट संबंध जोडला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo : नाना पाटेकर यांच्याकडून गैरवर्तन, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा धक्कादायक आरोप
सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने धक्कादायक आरोप केला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नागराज, आर्ची-परशाचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश
सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले नागराज मंजुळे, आर्ची आणि परशा’ने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेत प्रवेश केला असून, त्यांनी रीतसर प्राथमिक सदस्यत्व सुद्धा स्वीकारलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या ‘सैराट’ टीमचा ग्रामीण भागात प्रोमोशनसाठी उपयोग होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्ची आणि परशा’चा ग्रामीण महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग असल्याने त्याचा फायदा पक्षाला आणि मनसेच्या चित्रपट श्रुष्टीतील दबदब्याचा फायदा या तिघांना सुद्धा भविष्यात होऊ शकतो अशी चर्चा आहे.
7 वर्षांपूर्वी -
राम कदमांना आवरा! अफवांच्या आहारी जाऊन त्यांनी सोनाली बेंद्रेला ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली
मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना ‘एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन’, अशी मुक्ताफळे उधळणारे भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कॅन्सर झाल्याने उपचार घेण्यासाठी अमेरिकेत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेला अफवांच्या आहारी जाऊन ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. तसे त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्विट सुद्धा केलं. परंतु, ती अफवा असल्याचे ध्यानात येताच ते ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे राम कदम पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मराठी नाटकांची 'फोर्ब्ज' या जगप्रसिद्ध मासिकाने सुद्धा दखल घेतली
मराठी नाट्य श्रुष्टीसाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. कारण मराठी नाटकांची ‘फोर्ब्ज’ या जगप्रसिद्ध मासिकाने सुद्धा दखल घेतली असून त्यात भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मराठी नाटकांची नावं ‘फोर्ब्ज’च्या यादीत झळकली आहेत.
7 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होत. मागील अनेक दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते.
7 वर्षांपूर्वी -
माझा १९५० मधील 'सेल्फ क्लीक्ड' फोटो, ज्याला आज 'सेल्फी' म्हणून ओळखतात: लता दीदी
नमस्कार! मी माझा १९५० मधील ‘सेल्फ क्लीक्ड’ फोटो, ज्याला आज ‘सेल्फी’ म्हणून ओळखतात असं ट्विट करत लता दीदींनी त्यांचा ७० वर्ष जुना फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे ‘लेखका’च्या भूमिकेत? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जरी एक आक्रमक आणि अभ्यासू नैतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित असले तरी त्यांच्या मध्ये एक उत्तम कलाकार सुद्धा दडलेला आहे हे सर्वश्रुत आहे. त्यांना कला, साहित्य आणि संस्कृती या विषयाची उत्तम जाण असल्याचे त्यांच्या विचारात जाणवते. त्याच आक्रमक राजकारण्यामागील दडलेला लेखक लवकरच सर्वांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार पलटलं, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी कायम
नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात निवेदन देऊन मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी असल्याचं मान्य करणारऱ्या राज्य सरकारने काही दिवसातच सुरक्षेच कारण पुढे करत स्वतःचाच निर्णय फिरवला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विधिमंडळात दिली जाणाऱ्या निवेदनांवर सामान्यांनी किती विश्वास करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON