महत्वाच्या बातम्या
-
संसदेच्या नव्या इमारतीचं उदघाटन आणि शाहरुख खानचं मोदींची स्तुती करणारं ट्विट ही CBI रडारवरील समीर वानखेडेंसाठी धोक्याची घंटा?
New Parliament Inauguration | बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खानचे हे दोन्ही सिनेमे यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. तत्पूर्वी, पठाण चित्रपटातील ‘भगवी बिकनी’ वादानंतर भाजपने शाहरुख खानला प्रचंड लक्ष केलं होतं. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी शाहरुख खानवर धार्मिक टिपण्या करत खळबळजनक वक्तव्य करत केली होती. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाहरुख खानची प्रेत यात्रा देखील काढली होती. मात्र आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी अचानक शाहरुख खानचे गुणगान गाऊ लागले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Shah Rukh Khan | आरोपीच्या कुटुंबीयांशी केलेले बोलणे हे सेवा नियमांचे उल्लंघन? व्हाट्सअँप चॅट लीकवरून हायकोर्टात हेतूवर प्रश्न उपस्थित
Shah Rukh Khan | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीचा आरोप असलेल्या समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील चॅट मीडियात लीक झाल्याबद्दलही कोर्टाने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्या चॅट्स प्रसारमाध्यमांना लीक करणारे आपणच आहात का, अशी विचारणा न्यायालयाने वानखेडे यांना केली.
2 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश, सीबीआयला जबाब नोंदविण्याच्या सूचना
Sameer Wankhede | मुंबई हायकोर्टाच्या व्हेकेशन कोर्टात ही सुनावणी पार पडली, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, आरिफ एस डॉक्टर या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. समीर वानखेडे यांच्या वतीने रिझवान मर्चंट यांनी युक्तीवाद केला. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरवर वानखेडेंच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले.
2 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Exposed | चमत्कार? या 6 देशांचा प्रवास, 55 दिवस वास्तव्य, खर्च फक्त 8 लाख 75 हजार? ते CCTV फुटेजही खराब?
Sameer Wankhede Exposed | ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणाऱ्या एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता समोर येत असलेल्या नव्या माहितीनुसार वानखेडे यांनी आपल्या कुटुंबासमवेत अनेक परदेश दौरे केले होते. याशिवाय त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा संपत्ती अधिक होती.
2 वर्षांपूर्वी -
Real Face of Sameer Wankhede | सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे एक षडयंत्र होतं असं समीर वानखेडेंना दाखवायचं होतं? खरा चेहरा समोर येतोय
Real Face of Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या नेतृत्वात ऑक्टोबर 2021 एनसीबीन मुंबईतल्या एका जहाजावर छापा टाकला होता. या छाप्यात ड्रग्ज घेतल्याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत इतरांना अटक करण्यात आली होती. कोर्टात मात्र आर्यन खान आणि इतरांची निर्दोष मुक्तता झाली. एनसीबी आणि समीर वानखेडे आर्यन खानने ड्रग्स बाळगलं किंवा सेवन केल्याचा पुरावा देऊ शकले नव्हते.
2 वर्षांपूर्वी -
भ्रष्ट अधिकारी वानखेडेंच्या परदेश वाऱ्या, महागडी घड्याळ आणि गाड्या, नवाब मलिक यांनी तेव्हाच रॉयल लाइफस्टाइलची अशी माहिती दिली होती
Sameer Wankhede | बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. आर्यन खानला प्रकरणात मोठा खुलासा 18 कोटींची डील झाल्याचा खुलासा NCB व्हिजिलेन्सने केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनमधले माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
काळजीचं कारण नाही, आता पुढे महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीवर केलेला हा 'बेकायदेशीर कब्जा' हटवेल - सिमी गरेवाल
Actress Simi Garewal on Aaditya Thackeray’s Post | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा आणि टीका झाल्याचं पाहायला मिळालं. न्यायालयाने शिंदे सरकारला अप्रत्यक्ष दिलासा दिला, मात्र दुसऱ्या बाजूला स्पीकरचा प्रतोद निवडीचा निर्णय चुकीचा, प्रतोद आणि व्हीप बेकायदेशीर, राज्यपालांनी घटनेचं पालन केलं नाही असे गंभीर लिखित शेरे निकालात दिले आहेत. आमदारांच्या पात्रतेचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून त्यावर कोर्ट निकाल देणार नसून त्या निर्णयाचा अधिकार विधानसभा अध्यक्षांवर आहे, असे न्यायालयांनी म्हटले आहे. यासगळ्यात ट्विटवरुन शिंदे आणि फडणवीस यांच्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tim Cook with Madhuri Dixit | आमची मुंबई! ॲपल CEO टीम कुक यांनी मुंबईत माधुरी दीक्षित सोबत वडा पावचा स्वाद अनुभवला
Tim Cook with Madhuri Dixit | अधिकृत ॲपल स्टोअर मुंबईत सुरू होणार आहे, ज्यामुळे टिम कुक सध्या मुंबई भेटीवर आहेत. बॉलिवूड स्टार्सच्या शहरात टिम कुक त्यांना भेटणार नाहीत, असं होऊ शकतं का? ॲपलच्या सीईओंनी सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली. माधुरी दीक्षितने टीम कुक यांचे मुंबई स्टाईलमध्ये स्वागत केले. माधुरीने टीम कुक यांना मुंबईचा प्रसिद्ध वडापाव खायला दिला.
2 वर्षांपूर्वी -
Bholaa Box Office Collection | भोला चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती, लवकरच 70 कोटींचा टप्पा गाठणार
Bholaa Box Office Collection | बॉलिवूडसुपरस्टार अजय देवगणचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करत आहे. या चित्रपटाने शनिवारी ४.२५ कोटी ंची कमाई केली, तर शुक्रवारी ३.६० कोटींची कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५९.६८ कोटी रुपयांची कमाई केली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनलिक यांनी ही माहिती दिली आहे. अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाने ओपनिंग डे पासून 10 व्या दिवसापर्यंत एकूण 67.53 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट तमिळ हिट चित्रपट कैथीचा रिमेक आहे. चित्रपट दिग्दर्शक लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘भोला’ हा चित्रपट थ्रीडी आणि टूडी स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कैथी या चित्रपटाची रिमेक आवृत्ती भोला चित्रपटाला चित्रपटगृहात प्रेक्षक मिळवून देण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Priyanka Chopra in Auto | नो कार नो बाईक! प्रियांका चक्क रिक्षामधून गेली डेटला, निकसोबत शेअर केलेला फोटो व्हायरल
Priyanka Chopra in Auto | अभिनेत्री प्रियांका चोपडाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्रियांका पती निक आणि मुलगी मालतीसोबत नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका तिच्या कुटुंबासह भारतात परतली आहे. भारतामध्ये मुंबईसह अन्य शहरात रिक्षाने सर्वच जण प्रवास करतात. आता प्रियांकाने देखील निकसोबत रिक्षाने प्रवास केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dasara Movie | साऊथ सिनेमा लय भारी! नानीच्या 'दसरा' चित्रपटाचा धुमाकूळ, टाळ्या-शिट्यांच्या आवाजाने चित्रपटगृहे गजबजली
Dasara Movie | तेलुगू सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध सुपरस्टार नानीचा नवा चित्रपट दसरा प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दसरा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. दसरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतरला आहे. ‘दसरा’ या चित्रपटाचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेल, असे सांगत हा नानीचा सर्वात शानदार चित्रपट असल्याचे जाहीर केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bhola on Box Office | अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाला मोठा प्रतिसाद, पहिला रिव्ह्यू दमदार, पसंतीचं कारण काय?
Bhola on Box Office | अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाला मिळालेला सुरुवातीचा प्रतिसाद खूप चांगला दिसत आहे. हा चित्रपट ३० मार्चरोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वीच चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत होता. अशा तऱ्हेने अजय देवगणच्या आधीच्या ‘दृश्यम-२’ या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर यश मिळवून देऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tu Jhoothi Main Makkaar Box Office | रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये? सिनेमाला मोठी गर्दी होतेय
Tu Jhoothi Main Makkaar Box Office | बॉलिवूडसुपरस्टार रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट गेल्या आठवडाभरापासून पडद्यावर दिसत आहे. प्रदर्शनानंतर दुसऱ्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये आपले नाव नोंदवू शकतो. सिनेसृष्टीवर नजर ठेवणारे व्यासपीठ असलेल्या सॅनिलकच्या म्हणण्यानुसार, रणबीर कपूरच्या चित्रपटाने प्रदर्शनानंतर दुसऱ्या गुरुवारी सुमारे ४.७७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 9 व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 92.68 कोटी रुपयांचा निव्वळ कलेक्शन केला आहे. त्याचे ग्रॉस कलेक्शन १०३.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
BJP MP Kirron Kher | मला मतं देत नाहीत त्यांना चप्पलने मारलं पाहिजे, मोदी भक्त अनुपम खेर यांच्या खासदार पतीचं वक्तव्य
BJP MP Kirron Kher | चंदीगडच्या भाजप खासदार किरण खेर यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मला मतदान न करणाऱ्या मतदारांना चप्पलने मारलं पाहिजे असे धक्कादायक आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र खेर यांनी हे वक्तव्य कोणत्या संदर्भात केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेस कडून याला कडाडून विरोध केला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
The Elephant Whisperers Documentary | ‘द एलिफंट व्हिस्पर’ या भारतीय माहितीपटाने इतिहास रचला आहे. कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. या चित्रपटाची कथा प्राणी-मानवाच्या नात्यावर आधारित आहे. दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांनी हा पुरस्कार मातृभूमी भारताला समर्पित केला आहे. 41 मिनिटांचा हा ऑस्कर विजेता चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Naatu Naatu Won Oscar Awards 2023 | 'नाटू नाटू'ला बेस्ट सॉन्ग श्रेणीत ऑस्कर पुरस्कार, अभिनयाला स्टँडिंग ओव्हेशन
Naatu Naatu Won Oscar Awards 2023 | आरआरआरमधील एस एस राजामौली यांच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीत पारितोषिक मिळाले आहे. आत्तापर्यंत अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या नाटू नाटू गाण्याने या श्रेणीतील ऑस्कर ट्रॉफी भारतात आणून इतिहास रचला आहे. नाटू नाटू शिवाय This Is a Life, Lift Me Up, Hold my Hand आणि Applause गाणी या श्रेणीत नॉमिनेट झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Pathaan Box Office Collection | पठाण चित्रपटाने तिसऱ्या दिवशी कमावले 36 कोटी, भारतात कलेक्शन 160 कोटींच्या पार
Pathaan Box Office Collection | शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने १२५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. पठाण या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ३५ ते ३६ कोटी ंची कमाई केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pathaan Box Office Collection | पठाण सिनेमाने 2 दिवसांत कमावले 125 कोटी, प्रेक्षकांचा राजकीय बॉयकॉट ट्रेन्डला ठेंगा
Pathaan Box Office Collection Day 2 | बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने भारतासह जगभरात हिंदी चित्रपटाची आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग मिळवली आहे. कमाईच्या बाबतीत पठाण या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, पठाण या चित्रपटाने या गुरुवारी प्रजासत्ताक दिनी 70 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पठाण चित्रपटाच्या कलेक्शनच्या आकड्यात मोठी वाढ झाली. मात्र नेमकी आकडेवारी कितीतरी पटीने जास्त आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. खरं तर दक्षिणेच्या सर्वच भागांत प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रजासत्ताक दिनी सिनेमागृहांमध्ये चित्रपटासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
2 वर्षांपूर्वी -
Nora Fatehi Video | तो खाली पडताच नोरा फतेही म्हणाली, 'संभल के गिरो... संभल के’, आता नेटिझन्स सुरु झाले
Nora Fatehi Video | आपल्या जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाणारी नोरा फतेही सध्या महाथाग सुकेश चंद्रशेखर यांच्या प्रकरणामुळेही खूप चर्चेत आहे. बरं येथे आम्ही नोरा फतेहीच्या लेटेस्ट व्हिडिओबद्दल बोलत आहोत जिथे चुकून तिच्या तोंडून असे काही बाहेर पडले की आता युजर्स तिची खिल्ली उडवत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Avatar The Way of Water | अवतार 2 ने तोडला अव्हेंजर्स एंडगेमचा विक्रम, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला
Avatar The Way of Water | अवतार : द वे ऑफ वॉटर हा चित्रपट प्रदर्शित होऊन २३ दिवस झाले आहेत. पण चित्रपटाच्या कमाईचा वेग काही थांबत नाहीये. प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा विक्रम या सिनेमाने केला असतानाच आता प्रदर्शनानंतरही अवतार 2 ने आणखी एक विक्रम केला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Power Share Price | 3,044 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत अपडेट, मजबूत परताव्याचे संकेत - NSE: RPOWER
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN