24 February 2025 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर 2.42 टक्क्यांनी घसरला, स्टॉक प्राईस 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ - NSE: GTLINFRA
x

Rakhi Sawant | ड्रामा क्वीन राखी सावंतचा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिये पूर्वी डान्स, व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल

Rakhi Sawant

Rakhi Sawant | अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेली बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच कोणत्याना कोणत्यातरी कारणामुळे चर्चेमध्ये राहिली आहे. बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या कंगना रनाऔत नंतर राखी सामंतचा नंबर लागत आहे असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या राखी सामंतचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या राखी हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिच्यावर करावी लागणार असल्याचे डॉक्टरांकडून सांण्यात आले आहे. तसेच राखीने असे काही सांगितले आहे की, ज्यामुळे ती जास्तच चर्चेमध्ये आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल यांनी हॉस्पिटलमध्ये धिंगाणा घातल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे.

राखीने शेअर केलेला व्हिडीओ पहा :
स्वत:च्या पर्सनल अकाऊंटवरून राखी सावंतने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओमध्ये, तिच्या हातामध्ये ड्रिप असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. राखी आणि तिचा बॉयफ्रेंड अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या ‘लाइगर’ चित्रपटामधील आफत या गाण्यावर डान्स केला. व्हिडीओ शेअर करताना राखी कॅप्शनमध्ये लिहीते की, ‘डान्स मला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडत नाही, हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिये पूर्वीचा डान्स.’

सोशल मीडियावर राखी अन् आदिलला आलेल्या कॉमेंट्स :
शस्त्र क्रियेपुर्वीचा हॉस्पिटल मधील राखी सावंत आणि बॉयफ्रेंड आदिलच्या व्हिडीओवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या राखीची चिंता चाहत्यांना सतावत आहे. तर काही चाहते तिच्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत. तर दुसरीकडे, काहीजण तिला ट्रोल करत लिहीले आहे की, तु जिथे जाते तिथे नाटकच करतेस, आणि हॉस्पिटलमध्ये तुझ्यामुळे शांतता नांदत नसेल. एकाने लिहीले की- चलती फिरती आफत, दुसऱ्याने लिहीले की- बस करो ड्रामा क्वीन.

नेमके राखीला झाले तरी काय :
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखीच्या हातामध्ये ड्रिप असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, राखीच्या तब्येतीबद्दल अध्याप डॉक्टरांनी कोणताच खुलासा केलेला नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rakhi Sawant Hospital video viral Checks details 1 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)Rakhi Sawant(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x
close ad x
Marathi Matrimony