22 December 2024 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले
x

Ram Setu Trailer | रामसेतु चित्रपटाचा ट्रेलर आला समोर, ट्रेलर पाहून चाहते झाले खुश

Ram Setu Trailer

Ram Setu Trailer | प्रत्येक वर्षी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगामी ‘राम सेतू’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलर आज रिलीज झाला आहे. अक्षय कुमारच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी प्रेक्षक अत्यंत उत्सुक दिसत आहेत आणि या चित्रपटाचा ट्रेलर 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर बाबत आधीच अक्षय कुमारनेच त्याच्या चाहत्यांना माहिती दिली होती आणि तेव्हापासूनच चाहते ट्रेलरची वाट पाहत होते.

ट्रेलरने झिंकली चाहत्यांची मने
प्रेक्षकांच्या खुप प्रतिक्षेनंतर ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर 11 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटाचा दोन मिनिटे 9 सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते खूप प्रभावित झाले आहेत. तर चित्रपटाला उत्कृष्ट म्हणत आहेत. तसेच राम सेतू या अॅक्शन अॅडव्हेंचर फिल्ममध्ये अक्षय पुरातत्त्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ट्रेलरमधून चित्रपटाची कथा आली समोर
चित्रपटाच्या नावावर जर तुम्ही जोर दिला तर तुम्हाला लक्षात येईल की, नावाप्रमाणेच ही कथा राम सेतूच्या शोधाची आहे. अक्षय कुमार चित्रपटामधील राम सेतू शोधण्यासाठी खोल समुद्रामध्ये जातो आणि सर्वांसमोर सत्य प्रकट करतो आणि यावेळी तो म्हणतो, की या देशामध्ये रामाची लाखो मंदिरे आहेत पण एकच पूल आहे. राम सेतूच्या शोधामध्ये असलेल्या अक्षय कुमारच्या मार्गात अनेक समस्या आहेत आणि तो त्यांना ताकदीने तोंड देत आहे.

चाहत्यांचा आली अशी प्रतिक्रिया
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत तसेच वापरकर्त्यावर टिप्पणी करताना लिहिले की, व्वा, उत्कृष्ट. तर एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, कोणतेही आक्षेपार्ह दृश्य नाही, लैंगिक दृश्य नाही, रोमँटिक दृश्य नाही, तरीही हा एक उत्कृष्ट नमुना आहे. एका यूजरने लिहिले की, हे वेगळे आहे, शेवटचे सीन पाहून अंगावर काटा आला. अभिषेक शर्मा यांनी राम सेतू चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट वादात सापडला
एकीकडे, प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत तर रिलीजपूर्वीच राम सेतू हा चित्रपट वादामध्ये सापडला आहे. चित्रपटाच्या कथेत, पुरातत्वशास्त्रज्ञ रामसेतूच्या मिथर किंवा वास्तवाचे पुरावे शोधताना दिसत आहेत. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम सेतूशी संबंधित लोकांना कायदेशीर नोटीस पाठवली होती तसेच चित्रपटातून राम सेतूशी संबंधित तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ram Setu Trailer Out Checks details 13 October 2022.

हॅशटॅग्स

Ram Setu Trailer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x