22 February 2025 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

RSS प्रमुख मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट | प. बंगाल निवडणूक तयारी?

RSS, Mohan Bhagwat, Bollywood actor Mithun Chakraborty

मुंबई, १६ फेब्रुवारी: सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची बैठक महत्त्वाची मानली जाते.

2019 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेतली होती. मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले होते. मात्र सदनात सतत अनुपस्थित राहात असल्याने त्यांनी 20 महिन्यांतच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते राजकारणापासून दूरच आहेत. यानंतर आता गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेल्या मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांच्या खास भेटीने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

 

News English Summary: Sarsanghchalak Mohan Bhagwat met renowned actor Mithun Chakraborty. The discussion lasted for more than an hour and a half. Chakraborty said the visit was a family affair. However, the visit has political significance in the backdrop of the forthcoming West Bengal elections.

News English Title: RSS chief Mohan Bhagwat meets Bollywood actor Mithun Chakraborty west Bengal news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x