22 February 2025 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Dulhe Raja Remake | 'दुल्हे राजा' होणार किंग खान?, या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क शाहरुख खानने विकत घेतले

Dulhe Raja

Dulhe Raja |  बॉलिवूडचा किंग खान चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. येत्या वर्षी शाहरुख खान 3 चित्रपट घेऊन येत आहे. 2018 मध्ये शाहरूखचा ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर शाहरूखच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, येत्या ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये शाहरुख कॅमिओ करताना दिसून येणार आहे. काही दिवसांपुर्वीच शाहरुख खानचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. आता असे समोर येत आहे की, गोविंदा आणि रवीना टंडन यांचा हिट ‘दुल्हे राजा’ या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क शाहरुख खानने विकत घेतले आहेत.

किंग खानला कॉमेडी चित्रपट आवडतात
समोर येत असलेल्या बातम्यांनुसार शाहरूख खानने गोविंदा आणि रवीना टंडन यांचा हिट ‘दुल्हे राजा’ या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. दरम्यान, ‘दुल्हे राजा’ हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. ‘दुल्हे राजा’ चित्रपट हरमेश मल्होत्रा ​​यांनी दिग्दर्शित केला होता. माध्यमांनुसार किंग खानने याचित्रपटाचे रिमेकचे हक्क आणि निगेटिव्ह विकत घेतले आहेत.

चित्रपट प्रेक्षकांच्या कधी भेटीला येणार
दरम्यान, ‘दुल्हे राजा’च्या रिमेकमध्ये अध्याप कलाकार ठरलेले नाही आहे. सॅटेलाइट आणि डिजिटल अधिकार शाहरुख खान आणि त्याच्या कंपनीकडे असणार आहेत.

‘दुल्हे राजा’ चित्रपट कलाकार
1998 मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आलेला गोविंदा आणि रवीना टंडन यांचा ‘दुल्हे राजा’ चित्रपट हिट झाला होत. या चित्रपटामध्ये कादर खान, प्रेम चोप्रा, जॉनी लीव्हर, असरानी, ​​विजू खोटे आणि मोहनीश बहल यांच्या प्रमुख भूमिके मध्ये दिसून आले होते. या चित्रपटामधील गाणी आजही सुपरहीट आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shahrukh Khan bought Dulhe Raja film rights Checks details 18 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Dulhe Raja(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x