21 April 2025 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Shamshera, Adipurush, Pathan Movie | शमशेरा ते आदिपुरुषपर्यंत सिनेमांचे बिग बजेट आकडे, फॅन्सची उत्सुकता वाढली

Shamshera Adipurush Pathan

Shamshera Adipurush Pathan | येत्या काळात अनेक मोठे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत, त्यासाठी सिनेप्रेमींची चांगलीच उत्सुकता आहे. ज्या सिनेमातून एक सेलेब बऱ्याच दिवसांनी कमबॅक करत आहे, तर दुसरीकडे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एक जोडी दिसणार आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांचे बजेट खूप मोठे आहे. त्यामुळे या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही आगामी सिनेमांचं बजेट सांगतो, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या यादीत शाहरुखच्या पठाणपासून ते सलमानच्या टायगर ३ पर्यंतचा समावेश आहे.

पठाण :
शाहरुख खानच्या पठाण या सिनेमासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. शाहरुख खानसोबतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात शाहरुख खान एका हेर एजंटच्या भूमिकेत दिसू शकतो. बऱ्याच काळानंतर शाहरुख खान पुनरागमन करतोय आणि अशा परिस्थितीत समीक्षक आणि ट्रेड अॅनालिस्टना या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. जाणून घेऊयात पठाण सिनेमाचं बजेट 250 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ असणार आहे.

टायगर 3 :
सलमान खान आणि कतरिना कैफची सुपरहिट फ्रँचायझी टायगर, टायगर 3 चा तिसरा भाग खूप चर्चेत आहे. यावेळी सिनेमात आणखी दमदार अॅक्शन पाहायला मिळेल, असं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सलमान आणि कतरिनाला एकत्र पाहणंही चाहत्यांसाठी पर्वणी ठरेल. रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचं बजेट 225 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.

पोन्नियन सेल्वान :
नुकतंच पोन्नियन सेल्वन या सिनेमाचा टीझर रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. टीझरमध्ये दमदार अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळाले. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, विक्रम, कार्ती, जयम रवी, प्रकाश राज, नस्सर, शोभिता धुलिपाला, प्रभू आणि किशोर यांसारखे कलाकार दिसणार आहेत. चला जाणून घेऊयात की पोन्नियन सेल्वनचे बजेट ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे.

शमशेरा :
रणबीर कपूर सध्या शमशेरा या सिनेमामुळे चर्चेत आहे. रणबीर या सिनेमाचं खूप प्रमोशन करत असून सिनेमाशी संबंधित अनेक गुपितं तो उघडत आहे. रणबीरसोबतच वाणी कपूर आणि संजय दत्त या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे बजेट १५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

आदिपुरुष :
अखिल भारतीय चित्रपट आदिपुरुषची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. प्रभाससोबतच क्रिती सॅनन आणि सैफ अली खान या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ओम राऊत या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमाचं बजेट जवळपास ४०० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रह्मास्त्र :
अयान मुखर्जीच्या बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ या प्रोजेक्टसाठी सगळेच उत्सुक आहेत. एकीकडे व्हिज्युअल इफेक्ट्समुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला असताना दुसरीकडे या सिनेमात पहिल्यांदाच रणबीर कपूर आलिया भट्टसोबत मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे बजेट ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

बडे मियां छोटे मियाँ 2 :
काही काळापूर्वी टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्या ‘बडे मियां छोटे मियां 2’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचा मजेशीर प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, जो खरंच मजेशीर होता. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार असून त्याचं बजेट 300 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shamshera Adipurush Pathan Big budget movies release check details 14 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या