30 January 2025 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | फायदा घ्या, हा सरकारी कंपनीचा शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का
x

जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला | शिवसेनेकडून इशारा

Shivsena MLA Pratap Sarnaik, Eliminate Jaan Kumar Sanu, Bigg Boss

मुंबई, २८ ऑक्टोबर : सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.

सध्या जान कुमार सानूचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. “माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या अमेय खोपकर यांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे. “जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,” असं अमेय खोपकर म्हणाले.

दरम्यान, या वादात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी जानला या स्पर्धेतून वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ‘बिग बॉस’च्या 14व्या पर्वाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागांत त्यात सहभागी असलेली स्पर्धक दुसऱ्या प्रतिस्पर्ध्या सोबत मराठी भाषेत संवाद साधत असताना अत्यंत मुजोर, मराठी द्वेष्टा जान कुमार सानू नावाच्या प्रतिस्पर्ध्याने तिला तू मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल, असे सांगत अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडा ओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर, मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.

 

News English Summary: Shivsena MLA Pratap Saranaik has demanded that Jan Kumar Sonu should be excluded from the contest. In one of the recently aired episodes of the 14th episode of ‘Bigg Boss’, the contestant was communicating in Marathi with another contestant. The Marathi language has been insulted by shouting. Shiv Sena spokesperson MLA Pratap Saranaik has given a stern warning to Colors channel that if the Colors channel does not expel Mujor Jan Kumar Sanu from the series, then Shiv Sena will come on set and agitate in its own way.

News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik demands eliminate Jaan Kumar Sanu from Bigg Boss News Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x