17 April 2025 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक व नम्र आहेत - सोनू सूद

Sonu Sood, CM Uddhav Thackeray, Lokmat Maharashtrian of the Year award 2020

मुंबई, १८ मार्च: सोनू सूद याला आज ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्तुती केली. तसेच विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर उत्तरं देखील दिली. यावेळी अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

अभिनेता सोनू सूद याच्या मुंबईतील हॉटेलवर मुंबई महापालिकेनं कारवाई केली होती. यासंदर्भात सोनू सूदला थेट प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सोनू सूद म्हणाला की, “माझ्या हॉटेलवर झालेली कारवाई मला मान्य आहे. जे चूक आहे ते चूक आहे. पण मी ते अनधिकृत बांधकाम केलेलं नाही. मागील २२ वर्षांपासून संबंधित इमारत तशीच होती. मी त्या इमारतीच्या एखाद्या खिडकीतही बदल केले नव्हेते”, असं सोनू सूद त्याच्या हॉटेलवर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईबाबत म्हणाला. त्यानंतर त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या भेटीचा देखील अनुभव सोनू सूदनं बोलून दाखवला.

याबाबत सविस्तर बोलताना सोनू सूद म्हणाला की, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खरंच चांगली गोष्ट होती. त्यांनी मला खूप प्रेम दिलं. आदित्य ठाकरेंनीही माझं आनंदानं स्वागत केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक व नम्र आहेत. दोघंही खूप कमाल आहेत. उद्धव ठाकरेंशी भेटून खूप सकारात्मकता मिळाली आणि हे मी याआधीही अनेकदा सांगत आलोय”, असं सोनू सूद म्हणाला. त्यासोबतच मी जे काही बोलतो ते मनापासून आणि जे खरं आहे तेच बोलतोय, असं देखील सोनूसूद सांगयला विसरला नाही.

 

News English Summary: Sonu Sood was today honored with the ‘Lokmat Maharashtrian of the Year’ award. Answering a question, he praised Chief Minister Uddhav Thackeray. He also gave detailed answers to the questions asked. Many dignitaries were present on this occasion.

News English Title: Sonu Sood was today honoured with the Lokmat Maharashtrian of the Year award 2020 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या