मराठी कलाकार व्यक्त झाले किंवा नाही झाले तरी ट्रोलिंग; सोनाली ट्वीटरकरांवर संतापली
मुंबई: सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला होता. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सब टीव्ही वहिनीला सज्जड दम भरला होता. यावर त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली ‘सुविचार’ लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत!. ‘कानाखाली काढलेले मराठी सुविचार’ ह्यांना बरोबर वाचता येतील, असं म्हणत गंभीर इशारा दिला होता.
मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी…आपल्या ट्विटर अकाऊंटवरमुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटते असं मत मांडलं होतं.
दरम्यान, याच विषयाला अनुसरून काही मराठी कलाकारांनी व्यक्त होताना समाज माध्यमांवर संतप्त भावना व्यक्त करत मराठी बद्दलची भावना बोलून दाखवली होती. त्यात सोनाली कुलकर्णीने ट्विट करताना म्हटलं होतं, “मुंबई ची भाषा म्हणजे महाराष्ट्राची भाषा म्हणजे…..“मराठी”…..ज्यांना माहीत नाही त्यांना सांगा” असं ट्विट केलं होतं.
मुंबई ची भाषा म्हणजे महाराष्ट्राची भाषा म्हणजे “मराठी”
🙏🏻ज्यांना माहीत नाही त्यांना सांगा 🙏🏻
— Sonalee (@meSonalee) March 4, 2020
मात्र त्यानंतर देखील अनेक नेटिझन्सनी सोनाली कुलकर्णी तसेच इतर मराठी कलाकारांना धारेवर धरून प्रतिप्रश्न केले. तसेच इतर मराठी कलाकार का व्यक्त झाले नाहीत असे प्रश्न देखील त्यांनाच विचारले. त्यानंतर सोनाली चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. सोनालीने पुन्हा संतप्त भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, ” ट्वीटरकरांनी आता कुठल्याही कलाकारांनी त्यांची मते, अभिप्राय, भावना, इ. समाज माध्यमांवर व्यक्त करावी अशी अपेक्षा करणं थांबवावं.
कारण त्या मतांचं आदर करणं आपल्याला जमणार नाहीच…..कलाकार व्यक्त होत नाही म्हणून…..आणि मग व्यक्त झाले तरीही #trolling हे सुरूच राहतं.
ट्वीटरकरांनी आता कुठल्याही कलाकारांनी त्यांची मते, अभिप्राय, भावना, इ. समाज माध्यमांवर व्यक्त करावी अशी अपेक्षा करणं थांबवावं.
कारण त्या मतांचं आदर करणं आपल्याला जमणार नाहीच.कलाकार व्यक्त होत नाही म्हणून
आणि मग व्यक्त झाले तरीही #trolling हे सुरूच राहतं. #viciouscircle— Sonalee (@meSonalee) March 4, 2020
News English Summery: some Marathi artists were expressing their feelings about the Marathi media by expressing their anger over the media. In this, Sonalee Kulkarni tweeted, “The language of Mumbai is the language of Maharashtra. It was tweeted” Tell those who do not know Marathi … “. However, many netizens also questioned holding Sonalee Kulkarni and other Marathi artists on the stream. He also asked the question why other Marathi artists did not express themselves. After that, Sonalee is getting very angry. Sonalee has again expressed his anger, saying, “Tweeters should stop expecting any artists to express their opinions, opinions, feelings, etc. on social media because we will not be able to respect those opinions. So ….. and then expressed, #trolling continues.
Web News Title: Story Marathi Film actress Sonalee Kulkarni express her anger over Netizens after trolling.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL