धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून आणि मराठीला नख लावलं तर; उलट्या चष्म्याचा सरळ व्हिडिओ
मुंबई: सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती. तत्पूर्वी मनसेने महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण करता कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मनसेने आता मराठीचा मुद्दा सोडला का अशी चर्चा रंगली होती. परंतु सध्याच्या घटनेने राज ठाकरे यांच्या भाषांतील ‘आमच्या धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून आणि मराठीला नख लावलं तर मराठी म्हणून अंगावर घेईन’ असं म्हटलं होतं, जे ताज्या घटनेतुन आठवण करून देताना दिसत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सब टीव्ही वहिनीला सज्जड दम भरला होता. यावर त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली ‘सुविचार’ लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत!. ‘कानाखाली काढलेले मराठी सुविचार’ ह्यांना बरोबर वाचता येतील, असं म्हणत गंभीर इशारा दिला होता.
मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी…आपल्या ट्विटर अकाऊंटवरमुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटते असं मत मांडलं होतं.
त्यानंतर तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील वादावर, निर्माते असित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे यात काही वादच नाही…आपण सर्व भारतीय आहोत आणि मी सर्व भाषांचा सन्मान करतो” असं ट्विट करत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर या मालिकेत काम करणारे मेहता लाल या कलाकाराने व्हिडीओ जारी केला आहे. त्यात म्हटलंय की, भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्राचं शहर मुंबई येथील स्थानिक आणि प्रचलित भाषा मराठी आहे. मुंबईने नेहमी सर्वांना सामावून घेतले, सर्व भाषांचा सन्मान केला. मात्र चंपक चाचांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्यांची अंत:करणापासून माफी मागतो असं सांगितले आहे.
News English Summery: Then on the issue of Tarak Mehta Ka Reverse Glasses series, creator Asit Modi has explained on his Twitter account. There is no dispute that Mumbai is in Maharashtra and the official language of Maharashtra is Marathi … we are all Indians and I respect all languages, “he said. After this, Mehta Lal, who is working in the series, has released the video. It is said that Marathi is the local and prevalent language of Mumbai, the financial capital of India. Mumbai always accommodated everyone, respected all languages. However, the statement made by Champagchas says that he apologizes to the hearts of those who have hurt his feelings.
Web News Title: Story New video released SAB TV Serial Tarak Mehta Ka Ulta Chashma after MNS Threaten.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY