25 December 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

त्या अभिनेत्रीवर मंत्रालयात भीक मागण्याची वेळ; २०१८'मध्ये सामना'त बाता मारल्या होत्या: सविस्तर

Marathi Actress Aishwarya Rane

मुंबई: १९८५ साली प्रदर्शीत झालेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट मराठीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आजही या चित्रपटातील गाणी व डायलॉग्स प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटात झळकलेले अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, प्रेमा किरण असे सर्वच कलाकार आज मराठीतील नामवंत कलाकार म्हणून ओळखले जातात. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. परंतु आज ती अभिनेत्री ओळखताही येणार अशा अवस्थेत हलाखीचे जीवन व्यतीत करत आहे.

“सुरेखा’ उर्फ ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्या समवेत धुमधडाका, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत ‘भटक भवानी’ या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिका म्हणून काम केलं आहे. तसेच शराबी, नमक हलाल यासारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन, परबीन बाबी, निळू फुले, जयश्री गडकर यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत त्यांनी सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे.

दुर्दैवाने त्यांची कारकीर्द ऐन बहरात असताना अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घोड्यावरुन पडून त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पाठीचं हाड मोडल्याने कारकिर्दीला ब्रेक लागला. उपचारासाठी त्यांना मुंबईतील त्यांची सर्व संपत्ती विकावी लागली. पुढे हाती काम न राहिल्याने आणि नातेवाईकांनीही पाठ फिरविल्याने नियतीने त्यांच्यावर हालाखीची परिस्थिती आणली आहे.

ऐश्वर्या राणे यांची व्यथा शिवसेनेच्या सामना’मध्ये (सदर बातमीची लिंक) देखील जानेवारी २०१८’ला मांडली होती. ऐश्वर्या राणे यांच्या प्रस्तावाचा फेरआढावा घेत त्यांना अ श्रेणीचं मानधन देण्यात येणार असल्याचं बोललं गेलं. कलाकार आणि साहित्यिकांसाठी सरकार मानधन देतं. अ श्रेणीसाठी पात्र असूनही त्यांना मार्च २०१५ पासून क श्रेणीचं १५०० रुपयांचं मानधन देण्यात येत होतं. त्यामुळे ऐश्वर्या राणे यांना अ श्रेणीनुसार २१०० रुपये मानधन मिळणार असल्याच्या बाता मारल्या गेल्या. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत हे मानधन दरमहा कलाकार, साहित्यिकांना देण्यात येतं. यासाठी राज्य सरकारची विशेष समिती पात्र कलाकार आणि साहित्यिकांची निवड करते.

राज्यात सत्तेत असून देखील शिवसेनेने केवळ स्वतःच्या वर्तमानपत्रात विषय छापून आणला, मात्र कृतीत शून्य उतरल्याचं चित्र आहे. आज स्वतः उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत, मात्र आजची ऐश्वर्या राणे मंत्रालयाच्या खाली भीक मागून स्वतःचं पोट भरत असल्याचं वास्तव मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी पुन्हा निदर्शनास आणून दिलं असून त्यांना सर्व मदतीचं आश्वासन देखील दिलं आहे. विशेष म्हणजे त्या व्हिडिओ नंतर समाज माध्यमांवर शिवसेनेच्या ठाकरे सरकारवर देखील मराठी कलाकारांच्या या अवस्थेमुळे टीकेची झोड उठत आहे. मात्र याबाबत मनसे सरकारला फैलावर घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

 

 

News English Summery: Dhoomdhadaka, which was released in 1985, is known as one of the best films in Marathi. Even today the songs and dialogues in the film are remembered by the audience. Ashok Saraf, Mahesh Kothare, Laxmikant Berde, Nivedita Joshi-Saraf and Prema Kiran are all known as the famous Marathi artists in this movie. Another actress won the hearts of the audience in this film for her brilliant performance. But today, the actress is living a life that is unbelievable.

 

Web Title: Story when renowned actress Aishwarya Rane will get grade a pension from State Government.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x