16 April 2025 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Stree 2 Movie | OTT विश्व गाजवायला सज्ज झाली आहे 'श्रद्धा कपूर', 'स्त्री 2' ची सप्टेंबर महिन्याची रिलीज डेट आली समोर - Marathi News

Highlights:

  • Stree 2 Movie
  • स्त्री 2 ओटीटी रिलीज डेट
  • लवकर करणार 600 कोटींचा आकडा पार
Stree 2 Movie

Stree 2 Movie | 15 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहांत धुमाकूळ घालणारा ‘स्त्री 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. त्याचबरोबर या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स देखील ब्रेक केले. स्त्री टू हा स्त्रिया चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच सिक्वल होता. अभिनेत्री ‘श्रद्धा कपूर’ आणि ‘अभिनेता राजकुमार राव’ या दोघांनी या चित्रपटाची चांगलीच शोभा वाढवली. जगभरातील अनेक प्रेक्षकांना स्त्री 2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार याची उत्सुकता लागली होती. तर, आता सर्वांनी मोकळा श्वास सोडा. कारण सप्टेंबर महिन्यातच स्त्री 2 ओटीटीवर रिलीज होणार आहे.

स्त्री 2 ओटीटी रिलीज डेट :
नुकतीच स्त्री 2 ची ओटीटी रिलीज डेट समोर आली असून. येत्या 27 सप्टेंबरला हा थरारक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इतर थ्रिलर आणि हॉरर चित्रपटांच्या तुलनेत स्त्री 2 या चित्रपटाने ओटीटीवर येऊन प्रेक्षकांच्या मनाला दिलासा दिला आहे. दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा चित्रपट विनामूल्य पाहता येणार असल्याचं देखील समजतय.

लवकर करणार 600 कोटींचा आकडा पार :
स्त्री 2 या चित्रपटाने आतापर्यंत फक्त भारतातच 585 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा आकडा 600 कोटींपर्यंत जाणार असल्याचं समजत आहे. दरम्यान स्त्री-टू या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘अमर कौशिक’ यांनी केले असून अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी हे सहकलाकार देखील मुख्य भूमिकेत झळकले आहेत. फक्त नऊ दिवसानंतर ओटीटीवर श्रद्धाच्या स्त्री 2 ची हवा असताना दिसणार आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने आत्तापर्यंत सिनेसृष्टीला एकशे एक सिनेमे दिले आहेत. श्रद्धाचा भरपूर मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. सोबतच तिची इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फोलोविंग पाहायला मिळते. श्रद्धाने स्त्री टू चा एक पोस्टर तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की,”वो स्त्री है और उसने आखिर कर दिखाया… हिंदुस्तान की सबसे सर्वश्रेष्ठ नं 1 हिंदी फिल्म ऑफ ऑल टाइम!!!”. तिच्या या पोस्टवर आणि कॅप्शनवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर श्रद्धाचं कौतुक देखील केलं आहे.

Latest Marathi News | Stree 2 Movie on PTT 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#stree 2 movie(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या