15 November 2024 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

रजनीकांत यांचा राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय

Superstar Rajinikanth, quit politics

चेन्नई, २९ डिसेंबर: अभिनेते आणि दक्षिण भारतीय सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येतीच्या कारणावरून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर पत्रक शेअर करत रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे.

“मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही. पण तामिळनाडूच्या जनतेसाठी विविध माध्यमातून काम सुरुच राहील”, असं रजनिकांत यांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याचाही उल्लेख त्यांनी पत्रकात केला आहे. याशिवाय, या निर्णयामागे मला ‘बळीचा बकरा’ बनविल्याच मत तयार करुन घेण्याचा गैरसमज कुणी करुन घेऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

रजनीकांत यांना नुकतंच प्रकृती बिघडल्याने हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. २७ डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

 

News English Summary: Big news has come out regarding the political entry of Rajinikanth, a leader and superstar of South Indian cinema. Rajinikanth has decided to quit politics. He has announced that he will not enter politics due to health reasons. Sharing the leaflet on social media, Rajinikanth has said that he will not enter politics.

News English Title: Superstar Rajinikanth has decided to quit politics news updates.

हॅशटॅग्स

#Rajanikant(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x